PAK vs BAN: बांगलादेशने काढली इज्जत, पाकिस्तानचा कसोटी मालिकेत होणार क्लीन स्वीप?
PAK vs BAN : बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान (PAK vs BAN) पराभवाच्या छायेत आला आहे. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने (Bangladesh) शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा (Pakistan) दुसरा डाव 172 धावांवर रोखला. हा सामना आणि मालिका जिंकण्यासाठी बांगलादेशला 185 धावांचे लक्ष्य आहे.
बांगलादेशने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या. संघाला विजयासाठी आणखी 143 धावांची गरज असून त्याच्या सर्व विकेट शिल्लक आहेत. या मालिकेचा पहिला सामना बांगलादेशने 10 विकेट्सने जिंकला होता. जर उद्या बांगलादेश हा सामना जिंकण्यात किंवा अनिर्णित राखण्यात यशस्वी झाला तर पाकिस्तानविरुद्धचा कसोटी मालिकेतील हा त्याचा पहिला विजय होणार आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तान 274 धावा करू शकला, ज्यामध्ये कर्णधार शान मसूद, सॅम अयुब आणि आगा सलमानच्या अर्धशतकांचा समावेश होता. या डावात बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने 5 विकेट्स घेतले तर पहिल्या डावात बांगलादेशने 262 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून खुर्रम शहजादने 6 बळी घेतले. तर दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ 172 धावांत गडगडला. हसन महमूदने 5 तर नाहिद राणाने 4 बळी घेतले.
CBI ची मोठी कारवाई, आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक
तर दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचे सलामीवीर झाकीर हसन आणि शादमान इस्लाम यांनी आक्रमक सुरुवात केली. सध्या बांगलादेशने एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या आहे. ही दोन सामन्यांची मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. नऊ देशांच्या या स्पर्धेत बांगलादेश सहाव्या तर पाकिस्तान आठव्या क्रमांकावर आहे.
जातीय द्वेष पसरवाल तर गाठ माझ्याशी…सुजय विखेंचा अप्रत्यक्ष राणेंना टोला