मोठी बातमी! पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला स्थगिती

  • Written By: Published:
मोठी बातमी! पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला स्थगिती

Pankaj Deshmukh : पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (Pankaj Deshmukh) यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी गृहविभागाने चार आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली मुंबईला पोलिस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती. मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबईच्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) पंकज देशमुख यांनी धाव घेतली होती.

देशमुख यांच्या अर्जावर सुनावणी झाली. देशमुख यांच्याकडून अॅड. आर. जी. वालिया यांनी बाजू मांडली. त्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला स्थगिती देण्याचा आदेश प्राधिकरणाने दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गुरुवारी गृहविभागाने बदल्यांचा आदेश दिला होता. त्यानुसार पुणे ग्रामीण येथे पुणे शहरातील पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची बदली करण्यात आली आहे.

महायुतीच्या नेत्यांच्या मनातही CM पदासाठी फडणवीसांचे नाव नाही, आदित्य ठाकरेंचा खोचक टोला


दोन वर्षांचा कालावधी पूर्ण न होताच बदली कशी करता?

पंकज देशमुख यांना पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून 31 जानेवारी 2024 रोजी नियुक्ती देण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे. परंतु दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे. कार्यकाळ न पूर्ण होताच ही बदली करण्यात आली तसेच तत्काळ बदली करताना त्याचे कारणही देण्यात आलेले नाही, असा मुद्दा प्राधिकरणापुढे देशमुख यांच्या वकिलांकडून मांडण्यात आले. पंकज देशमुख यांच्या बदलीमागे कोणतेही कारण दिलेले नाही. अनेक अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण न होता मध्येच त्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यासाठी प्रशासकीय कारण देऊन या बदल्या केल्या जातात. परंतु मध्यावधी बदली करताना त्यासाठी एक तरी कारण दिले पाहिले, असे पोलिस कायद्यात सांगण्यात आलेले आहे. पंकज देशमुख यांची मध्येच बदली करण्यासाठी एकही कारण दिलेले नाही. त्यामुळे पुढची सुनावणी होऊपर्यंत देशमुख हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून राहतील, असे प्राधिकरणाने आदेशातत म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या