जयंत पाटलांनी टेन्शन वाढवलं! देवेंद्र फडणवीस अन् शरद पवारांमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत संवाद?

  • Written By: Published:
जयंत पाटलांनी टेन्शन वाढवलं! देवेंद्र फडणवीस अन् शरद पवारांमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत संवाद?

Jayant Patil on MVA CM face : विधानसभेची निवडणूक पुढच्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीत हालचाली सुरु झाल्या आहेत. (Jayant Patil) विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल ते आधी जाहीर करा, अशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी आहे. तर शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असा जाहीर करता येत नाही. संख्याबळाच्या अधारावर मुख्यमंत्री ठरवला जातो, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काही अलबेल नाही असं सध्याचं चित्र आहे.

एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार का?, एका वाक्यात देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच आहे किंवा मविआत मतभेद आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, पवारांच्या मनात तीन नावे आहेत. ती फडणवीस यांना माहीत आहेत. म्हणजे पवार आणि फडणवीस यांच्यात संवाद आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी चांगलाच धमाका उडवला आहे. ते टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिणीवर बोलत होते.

महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. महाविकास आघाडी एकमताने लढाई लढत आहे. मुख्यमंत्रीपदावरून वाद होतील असं गोड स्वप्न कुणाला पडलं असेल तर त्यांनी ते पाहावं. उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व केलं आहे. ते आमचे मुख्यमंत्री होते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. त्यांना आक्षेप नाही. पण निवडणुकीसाठी स्ट्रॅटेजी म्हणून आम्ही ठरवू, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

अजितदादा गुलाबी झाले पण भगवे नाही?; काळजी करू नका, त्यांना सर्व गुण लागतील : फडणवीस

युतीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी येतंय का? एवढा मोठा पक्ष पण त्यांना फडणवीस यांचं नाव सांगता येत नाही. एवढंही धाडस नाही. साधं लॉजिक पहा, पवारांच्या मनात तीन नावे आहेत. ती फडणवीस यांना माहीत आहेत. म्हणजे पवार आणि फडणवीस यांच्यात संवाद आहे का? अजितदादा आणि शिंदे यांना अस्वस्थ केलं जात आहे. ते चिंतीत होतील. हा गुमराह करण्याचा प्रयत्न आहे, असा मोठा दावा जयंत पाटील यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube