खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन सातत्याने सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांमध्ये मॅरेथॉन बैठका झाल्या होत्या. पण या मॅरेथॉन बैठकांमधील निष्फळ ठरली होती. अखेर दिल्लीवारी करुन आल्यानंतर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे. राज्य सरकारकडून खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आलं असून इतर महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ… pic.twitter.com/KwhXn15uO2
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 14, 2023
राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनूसार धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, छगन भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा ही खाती देण्यात आली आहेत.
कोणतं खातं कोणाकडे?
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग .
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
एका घरात 2 दोन चुली करायला, आम्हाला जबाबदार धरणार का? बडतर्फीनंतर खदखद बाहेर/
राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांना कोणतं खातं मिळालं?
अजित पवार – अर्थमंत्री
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा मंत्री
आदिती तटकरे – महिल व बालकल्याण मंत्री
धनंजय मुंडे – कृषीमंत्री
अनिल पाटील – मदत व पुनर्वसन मंत्री
दिलीप वळसे-पाटील – सहकार मंत्री
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण मंत्री
संजय बनसोड – क्रीडामंत्री
धर्मराव बाबा आत्राम – अन्न व औषध प्रशासन मंत्री
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे: