Download App

Sharad Pawar Retirement : आता वज्रमूठ सभा होणार नाही; जयंत पाटलांनी थेट सांगून टाकले

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Retirement : 1 मे रोजीच्या वज्रमूठ सभेमध्ये आमचे ठरले होते की नाशिक, पुणे, कोल्हापूर येथे होणाऱ्या वज्रमूठ सभा या काही दिवसांनंतर घ्यायच्या, असे जयंत  पाटील म्हणाले आहेत. सध्या ऊन खूप वाढत आहे. त्यामुळे या सभांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच झाल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता आागामी काळात होणाऱ्या वज्रमूठ सभा या रद्द झाल्या आहेत.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडी राहणार की तूटणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आज सकाळीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पुढच्या होणाऱ्या वज्रमूठ सभांविषयी भाष्य केले होते.

महाविकास आघाडीला ढील पडणे हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; बावनकुळेंची टीका

याअगोदर जयंत पाटील यांना आजच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यावर त्यांनी भाष्य केले आहे. मला बैठकीला बोलवण्याची गरज वाटली नसेल. प्रत्येक ठिकाणी आपण असलचं पाहिजे, असा आग्रह आपण करु नये, असे ते म्हणाले आहेत. तसेच बैठकीला बोलवले नसल्याने जयंत पाटील नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. मी पक्षावर नाराज नाही व पक्षदेखील माझ्यावर नाराज नाही, असे ते म्हणाले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी नव्या नेतृत्वावर बोलायला नकार दिला आहे.

Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप

नाना पटोलेंनी यावर सांगितलं की,  राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत जाईल असं मला वाटत नाही. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. उरला प्रश्न महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेचा… तर सध्या पावसाळा चालू झालेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात पाऊस येतो. त्यामुळं या सभेविषयी एक मिटींग आज होणार आहे. त्यामुळं पुढील वज्रमुठ सभा होणार की नाही, हे लगेच सांगता येणार नाही. वज्रमुठ सभेविषयी बैठिकत निर्णय घेण्यात येईल, असं पटोले यांनी सांगितलं.

 

 

 

Tags

follow us