मुंबई : मुंबईकरांसाठी एक खास बातमी आहे. राज्य सरकारने (State Govt) मुंबई शहर (Mumbai) आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांना नारळी पौर्णिमा (Narali Pornima) आणि ज्येष्ठा गौरी विसर्जन (Gauri Visarjan) या दोन सणांसाठी स्थानिक सु्ट्टी जाहीर केली आहे. हे सण कोकणासह आणि मुंबईतील कोळी, मराठी आणि इतर समुदायांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. या सुट्टीमुळे मुंबईकरांना आपल्या सांस्कृतिक परंपरा आणि सण उत्साहाने साजरे करण्याची संधी मिळणार आहे. (Holiday declared for Narali Poornima)
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम करावे : तुषार कुटे
नारळी पौर्णिमा (८ ऑगस्ट) आणि ज्येष्ठा गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) या दोन दिवसांसाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या संदर्भात शासनाकडून अधिकृत आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
दरवर्षी दहीहंडी (गोपाळकाला) आणि अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) या सणांना सुट्टी दिली जाते. मात्र, यावर्षी हे दोन्ही सण शनिवारच्या दिवशी येत आले आहेत. त्यादिवशी कार्यालयांना आधीपासूनच नियमित सुट्टी असते. त्यामुळे, या ऐवजी दोन नवीन सणांच्या दिवशी स्थानिक सुट्टी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
ब्रेकिंग! खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट; खास पैठणीचं गिफ्ट, राजकारण तापलं…
मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच, ज्येष्ठा गौरी विसर्जनालाही विशेष पारंपरिक महत्त्व आहे. मुंबईमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन मोठ्या भक्तिभावाने साजरे होते. यानिमित्ताने घरोघरी मंगलमय वातावरण असते. त्यामुळं नागरिकांकडून सुट्टीची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने यंदा या दोन्ही दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.
त्यानुसार, ८ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार) – नारळी पौर्णिमा आणि २ सप्टेंबर २०२५ (मंगळवार) – ज्येष्ठा गौरी विसर्जन या दिवशी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी राहील.