विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम करावे : तुषार कुटे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम करावे : तुषार कुटे

Tushar Kute : जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी कार्यावर फोकस ठेवणे, वेळेचे नियोजन करणे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असावी. तंत्रज्ञानाच्या युगात एआय (कृत्रिम बुद्धीमत्ता) च्या तांत्रीक बाबींचा अभ्यास करावा. तसेच विद्यार्थीदशेत रोज नव नवीन गोष्टी शिकरण्याची जिद्द बाळगावी.” असे विचार एमआयटीयू रिसर्च पुणे येथे डेटा सायंटिस्ट आणि संशोधक तुषार कुटे (Tushar Kute) यांनी व्यक्त केले.

अलार्ड युनिव्हर्सिटीच्या ‘इंजिनियरींग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’, ‘अलार्ड स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट’ च्या वतीने आयोजित दीक्षारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्याच प्रमाणे स्कूल ऑफ फार्मसी, स्कूल ऑफ हेल्थ अँड बायोसायन्स व स्कूल ऑफ लॉ सुद्धा दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न झाला. दिक्षारंभ केवळ एक ओरिएंटेशन नव्हे तर व्यावसायिक उत्कृष्टता आणि वैयक्तिक प्रगल्भतेकडे नेणार्‍या परिवर्तनशील प्रवासाची पहिली पायरी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. यावेळी टेक महिन्द्राचे बिझनेस सोल्यूशनचे नितीन कानडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलार्ड युनिव्हर्सिटी संस्थापक अध्यक्ष व कुलपती डॉ. एल.आर. यादव होते. तसेच संशोधक डॉ. देविदास भालेराव, फार्मा इंडस्ट्रीतील तज्ज्ञ संजय देशमुख व ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. एस.बी.बाखरिया यादव उपस्थित होते.

तुषार कुटे म्हणाले,” वर्तमान काळात एआय कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे जग बदलत आहे. यातून रोजगाराच्या मोठ्या संधी ही उपलब्ध होत असताना त्यापासून विद्यार्थ्यांना दूर राहणे योग्य नाही. तंत्रज्ञानाची कास धरून त्याचे अध्ययन करावे. एआयमध्ये इंजिनियरिंग, मशीन लर्निंग स्पेशालिस्ट, उद्योजक, संशोधन सहकारी, सॉफ्टवेअर डेव्हलपर, तंत्रज्ञान विश्वेषक सारख्या गोष्टींमध्ये करियर करू शकतात.”

डॉ. एल. आर. यादव म्हणाले,”अलार्ड युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना ज्ञान, शिस्त, मूल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणिव करून देते. त्यातून विद्यार्थी हा परिपूर्ण होतो. त्याची उत्कंठा जागृत करून समाज कार्यासाठी त्यांना प्रेरित केले जाते असे सांगितले.

नितीन कानडे म्हणाले,” पॅशन, सतत शिक्षणाची जिद्द, वेळेचे नियोजन, कुतूहलाची क्षमता, बदलत्या तंत्रज्ञानाची अत्याधुनिक माहिती आणि कौशल्य आत्मसात केल्यास विद्यार्थी यशस्वी होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम हे जीवनभर स्पेस आणि मिसाइल या संदर्भात शिक्षण घेत होते. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कार्य काळात शिक्षकांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे तंतोतंत पालन करावे.”

डॉ. सोहम चितलांगे म्हणाले,” अलार्ड विद्यापीठ नवीन दृष्टी, नेतृत्व, दक्षता, कठोर परिश्रम आणि समर्पण या पाच स्तंभाच्या आधारे उभारण्यात आले आहे. येथे विद्यार्थ्यांना 70 टक्के प्रात्यक्षिक आणि 30 टक्के थेरॉटिकल ज्ञान दिले जाते. जागतिक दर्जाच्या दिशेने वाटचाल करणारे या विद्यापीठातील विद्यार्थी केवळ नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे असतील.”

शरद पवारांना धक्का , आगामी निवडणुकांपूर्वी ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये

एस. के श्रीवास्तव म्हणाले,”विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी व त्यांना प्रेरित करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित शिक्षकांची टीम आहे. डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम म्हणत असे की, झोपतांना स्वप्न पाहणे वेगळे आहे पण खरे स्वप्न तेच आहे जे आपल्याला झोपू देत नाही. आज देशाला अशा विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. यावेळी कुलसचिव डॉ. अमित झांबरे यांनी स्वागत केले. अ‍ॅकॅडमिक्स डीन डॉ. संतोष श्रीवास्तव यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube