Download App

Maharashtra Budget : महिलांसाठी अजितदादांच्या मोठ्या घोषणा, अनेक नव्या योजना सुरू करणार

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

Maharashtra Assembly Session Live : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Session) आजचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात (Maharashtra Budget) सादर केला. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या. विविध योजनांसाठी तरतूद करण्यात आली. तसेच काही नव्या योजनांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. अजित पवार यांनी यावेळी राज्य सरकारची महत्वाकांधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली.

निर्मल वारीसाठी 36 कोटींचा निधी, देहू आळंदी पंढरपूर मार्गावरील वारकरऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार आहे.  प्रतिदिंडी 20 हजार रुपये निधी देणार आहोत. लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, बस प्रवासात सवलत, शक्ती सदन योजना अशा योजनांची अंमलबजावणी सरकारकडून केली जात असल्याचे अजित पवार म्हणाले.

१० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत करणार. सरकारी रूग्णालयात गर्भाशय कर्करोगाची तपासणी केली जाणार. प्रत्येक मुलीला महिन्याला दीड हजार रूपये मिळणार. लाडकी बहिण योजनांसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी निधी दिला जाईल असे स्पष्ट करत अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या नव्या योजनेची घोषणा केली.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची अजित पवारांकडून घोषणा; जुलैपासून लागू, वाचा सविस्तर

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करत प्रत्येक पात्र कुटुंबियांना 3 गॅस सिलिंडर मोफत देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. शेतमाल साठवणुकीसाठी गाव तेथे गोदाम योजना राबवणार. यात नवीन गोदामे आणि आधीच्या गोदामांची दुरुस्ती केली जाणार. यासाठी 341 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पिकांच्या किंमतीत घसरण झाली. आता कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

प्रति लीटर पाच रुपये अनुदानाची योजना पुढे सुरु ठेवली जाणार आहे. शेळी मेंढी व कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील योजनेच्या निधीत वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास भरपाई 20 लाखांवरून 25 लाख करण्यात येत आहे. पशुधनाच्या नुकसान भरपाईतही वाढ केली जाणार आहे.

उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत. यासाठी चार हजार कोटी खर्च येणार असून त्याची तरतूद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी 650 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातल्या 108 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. मागेल त्याला सौर ऊर्जा पंप आठ लाख शेतकऱ्यांना देणार आहेत.

युवा वर्गाला सक्षम करण्यासाठी योजना सुरू आहेत. नवीन योजना सुरू करणार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करणार. यात प्रति विद्यार्थाी दहा हजार रुपये विद्यावेतन देणार. पाचशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ करणार आहोत. पात्र विद्यार्थीनींनी मोफत शिक्षण देण्यात येईल. तसेच दरवर्षी दहा लाख युवकांना कार्य प्रशिक्षण देण्याचे सरकारचे नियोजन आहे. यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करणार आहोत असे अजित पवार म्हणाले.

बुलढाणा जिल्ह्यात नवीन आयुर्वेदिक शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार आहे तसेच सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करणार असल्याच अजित पवार म्हणाले.

पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा; सभागृहात फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

आर्थिक वर्ष 2023-24 चा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल काल सादर करण्यात आला होता. या अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था 7.6 टक्के दराने प्रगती करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. देशाच्या अर्थव्यवस्थेतही 7.6 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आज अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांनी जोरदार घोषणा देत सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला.

सन 2011 -12 ते 2022-23 मध्ये देशाच्या सांकेतिक स्थूल उत्पन्नात राज्याचा हिस्सा 13.9 टक्के असून त्या पाठोपाठ तामिळनाडूचा (8.7 टक्के) हिस्सा आहे. 2023-24 च्य पूर्वानुमानुसार राज्य अर्थव्यवस्था 7.6 टक्के तर देशाची अर्थव्यवस्थाही 7.6 टक्क वाढणे अपेक्षित आहे. या अहवालानुसार कृषी व निगडीत कार्यात राज्यात 1.9 टक्के वाढ अपेक्षित आहे. उद्योग क्षेत्रात 7.6 टक्के तर सेवा क्षेत्रात 8.8 टक्के वाढ अपेक्षित आहे. या अहवालानुसार राज्याचं स्थूल आर्थिक उत्पन्न 40.44 लाख कोटी रुपये इतकं आहे.

follow us