Download App

मराठी भाषा दिन : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय आणि तो कसा मिळतो ?

  • Written By: Last Updated:

आज मराठी भाषा दिन त्यानिमित्ताने मराठी अभिजात भाषेला दर्जा कधी मिळणार? याची चर्चा सुरु आहे. पण अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय आणि तो कसा मिळतो ? हे समजून घेऊ

आज मराठी राजभाषा दिन. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रमही आयोजिले केले जातात. या दिवशी राज्य सरकार, विविध संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मराठी भाषेचे संवर्धन करणं हा यामागचा उद्देश आहे. पण या सगळ्यांसोबत एक मागणीची कायम चर्चा होते, ते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार?

अभिजात भाषा दर्जा देत कोण ?

अभिजात भाषा हा दर्जा देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय हा दर्जा देत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले.

अभिजात भाषा दर्जाचे निकष काय?

केंद्र सरकारने हा दर्जा देण्यासाठी काही निकष ठरवले आहेत. ते निकष पुढीलप्रमाणे

भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा

सध्या कोणकोणत्या भाषेला अभिजात दर्जा

भारतात सध्या ६ भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे.
तामिळ (२००४)
संस्कृत (२००५)
कन्नड (२००८)
तेलुगु (२००८)
मल्याळम (२०१३)
ओडिया (२०१४)

अभिजात दर्जाचे फायदे काय?

गेल्या काही वर्षांपासून या दर्जासाठी सर्वाकडून मागणी केली जात आहे. तर हा दर्जा मिळाल्यांनतर याचे नक्की काय फायदे होतात, हे पाहणेही महत्वाचं आहे. अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी पुढीलप्रमाणे फायदे होतात.

मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे इ.
भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.
महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांना सशक्त करणे.
मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे. इ.

सर्वच पक्षांचा पाठिंबा पण…

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा असलेला मुद्दा आहे. राज्यातील सर्वच पक्ष याच्या समर्थनात आहेत पण तरीही ही मागणी पूर्ण होत नाही. मागील काही वर्षापासून सर्वच राजकीय पक्षाकडून याचा पाठपुरावा केला जात आहे.

२०१९ साली तत्कालीन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी लोकसभेत सांगितलं होतं की हा प्रस्ताव सक्रीय विचाराधीन आहे. त्याआधी २०१८ साली तत्कालीन सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी लेखी उत्तरात काय सांगितलं होतं तर हा प्रस्ताव केंद्राच्या सक्रीय विचाराधीन आहे. तरीही अजून ही मागणी मात्र पूर्ण होत नाही.

या सगळ्या राजकीय प्रक्रियेत हा मुद्दा अडकला असला तरी आपण मात्र आपल्या मराठी भाषेला जपूया, वाढवूया, याच मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देऊया.

Tags

follow us