Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले तर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाला समोरे जावे लागले. त्यानंतर पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम तपासणी व व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली होती. नगर जिल्ह्यातून देखील अनेक उमेदवारांनी ही मागणी केली होती. मात्र आता अनेक उमेदवारांनी यामधून माघार घेतली आहे.
माजी आमदार शंकरराव गडाख यांनी देखील ईव्हीएम पडताळणीचा अर्ज मागे घेतला आहे. गडाख यांचा या संदर्भातील लेखी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे. या प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाकडे नियमानुसार जमा केलेली रक्कम मिळण्याची मागणी या लेखी अर्जात करण्यात आलेली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीच्या अनेक मातब्बर उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर या उमेदवारांकडून ईव्हीएम तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र आता पराभूत उमेदवारांकडून माघार घेतली जात आहे. यापूर्वी नगर जिल्ह्यातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिषेक कळमकर तसेच राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ईव्हीएम तपासणी आणि पडताळणीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेतले होते. आता त्यांच्या पाठोपाठ नेवासा मतदारसंघाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी देखील ईव्हीएम पडताळणीचा अर्ज माघारी घेतला आहे.
बाळासाहेब थोरातांसह पवारांच्या या शिलेदाराने ईव्हीएम पडताळणी अर्ज घेतला मागे
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीमधील पराभूत उमेदवारांनी पडताळणीची मागणी लेखी अर्जाद्वारे मतदान केंद्रनिहाय ठरविण्यात आलेल्या रकमेचा भरणा करीत केली. अहिल्यानगर जिल्ह्यातून दहा पराभूत उमेदवारांनी लेखी अर्जाद्वारे जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे केली होती. यात प्रा. राम शिंदे, राणी लंके, प्रताप ढाकणे, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, अभिषेक कळमकर, प्रभावती घोगरे, संदीप वर्पे, शंकरराव गडाख आणि राहुल जगताप या दहा जणांचा समावेश होता.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीत पराभूत झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला संबंधित मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांच्या 5 टक्के मतदान केंद्रांतील ईव्हीएम अर्थात मतदान यंत्राची तपासणीच्या मागणीस मान्यता आहे. त्यासाठी एका मतदान केंद्रातील ईव्हीएमच्या तपासणीसाठी 47 हजार 200 रुपये फी संबंधित उमेदवाराने आयोगाकडे मागणी अर्जासोबत जमा करणे बंधनकारक आहे.
आधुनिक अभिमन्यू, ईव्हीएम अन् विरोधक, देवेंद्र फडणवीसांची सभागृहात तुफान फटकेबाजी