Ahilyanagar News : अहिल्यानगरच्या भिंगार शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल (Dr. babasaheb Ambedkar) अवमानजनक लिखाण करुन पत्रके भिरकावल्याप्रकरणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी अहिल्यानगर शहरातील उड्डाणपुलावरुन फरिद सुलेमान खान (रा. आलमगीर, भिंगार) या आरोपीने डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक लिखाण करुन पत्रके भिरकावले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ भिंगार शहारातील आंबेडकरी समाजाच्यावतीने बंद पाळून निषेध व्यक्त केलायं. भिंगार बंदला विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलच्यावतीने समर्थन देण्यात आलं.
नॅट सायव्हर-ब्रंटने रचला इतिहास; महिला विश्वचषकात अशी कामगिरी करणारी ठरली पहिली खेळाडू
आक्षेपार्ह पत्रके भिरकावल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील राजकीय नेत्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सिद्धार्थ आढाव, सृजन भिंगारदिवे, आदींनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केलीयंं.
टेक इंडस्ट्रीत मोठा धक्का! डिसेंबरपर्यंत 50 हजारांहून जास्त IT कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता, अहवाल समोर…
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित आरोपी भिंगारलगतच आलमगीर परिसरात राहत असल्याने दिं. 11 ऑक्टोबर रोजी भिंगार शहर कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला. यावेळी भिंगार शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांनीही बंदला उस्फूर्त प्रतिसाद देत दुकाने बंद ठेऊन निषेध पाळला. यावेळी आरपीआयचे अमित काळे, सिद्धार्थ आढाव, सृजन भिंगारदिवे, आशिष भिंगारदिवे, संदीप साळवे, अजिंक्य भिंगारदिवे, आदी कार्यकर्त्यांनी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
आज शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश…
अहिल्यानगर शहरात आक्षेपार्ह पत्रके भिरकाल्याप्रकरणी घटनेचा निषेध करण्यासाठी आज शिवशक्ती-भीमशक्तीचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप, हिंदुत्ववादी नेते सागर बेग, अॅड. वाल्मिक निकाळजे उपस्थित राहणार आहेत.
मविआ नेत्यांसोबत राज ठाकरेही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार, फडणवीस, शिंदेंनाही निमंत्रण, राऊतांची माहिती
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शहरात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा पार पडली.या सभेतून एमआयएम नेत्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका केली. या टीकेनंतर आज होणार्या शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चातून आमदार संग्राम जगताप प्रत्युत्तर देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.