Download App

अहिल्यानगरमध्ये तणाव! मुस्लिम धर्मगुरुचं नाव रोडवर लिहून विटंबना, आमदार संग्राम जगताप काय म्हणाले?

अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरात धार्मिक भावना दुखावल्याने दोन गटांत किरकोळ वाद झाले.

  • Written By: Last Updated:

Ahilyanagar Tension MLA Sangram Jagtap Reaction : अहिल्यानगर शहरात आज दोन गटांत धार्मिक कारणावरून वाद झाला. त्यानंतर संतप्त जमावाने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती चिघळली अन् पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

आमदार संग्राम जगताप काय म्हणाले?

आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना विनाकारण कोणी रास्ता रोको करत असेल, सामान्य जनतेस वेठीस धरत असेल तर ते योग्य नाही. पोलिसांवर सुद्धा तिथे हल्ला करण्यात येत आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन देखील आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. पोलिसांनी संशयित ताब्यात घेतलाय. त्यामुळे आंदोलन करण्याची गरज नाही, असं देखील आमदार जगताप यांनी म्हटलं आहे.

रस्ता मोकळा करा, असं आवाहन पोलीस देखील करत आहे. रास्ता रोको सुरू असताना काही समाज कंटकांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलाय. अफवांवर विश्वास ठेवू नका, असं देखील आवाहन पोलिसांनी केलंय.

संतप्त गटाने…

अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरात धार्मिक भावना दुखावल्याने दोन गटांत किरकोळ वाद झाले. कोतवाली पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच संतप्त गटाने आज (ता. 29) सकाळी 11 वाजता अचानक कोठला चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात केला आहे.

मोर्चा निघण्याआधीच लाठीचार्ज

अज्ञातांनी मुस्लिम धर्मगुरूंचं नाव (Ahilyanagar Tension) रस्त्यावर लिहित विटंबना केली होती. याचा निषेध करण्यासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्त होता. परंतु या मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं. पुणे ते छत्रपती संभाजीनगर या (Police Lathicharge) रस्त्यावर कोठला हे गाव आहे. एक ते दीड तास रास्ता रोको सुरू होता. तणावपूर्ण शांतता या भागात होती. त्यानंतर मात्र आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. मोर्चा निघण्याआधीच पोलिसांनी लाठीचार्ज केलाय.

या घटनेचे पडसाद अहिल्यानगर शहरात उमटत आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात देखील (MLA Sangram Jagtap Reaction) घेतलं आहे. कोतवाली पोलीस स्टेशन भागात ही घटना घडली आहे.

follow us