Ahilyanagar Rain : जनावरं, पिकं, पूल वाहुन गेले; अहिल्यानगरमध्ये आभाळ फाटलं…
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने अनेक गावांना फटका बसलायं. पावसात अनेक पिके, जनावरे वाहून गेले आहेत.

Ahilyanagar Rain : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांत ढगफुटीससदृश्य (Ahilyanagar Rain Update) पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक गावांना जोडणारे पुलं पाण्याखाली गेल्याने सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ, जोगेवाडी, मानेवाडी ढाकनवाडी, पिंपगाव, तप्पा, कुत्तरवाडी भागात कालपासून धो-धो पाऊस बरसला आहे. या पावसाचे रौद्र रुप पाहून ढगफुटीचं झाल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे.
पु्ण्यात तुफान पाऊस! घरे अन् वाहने पाण्याखाली, शाळांना सुट्टी जाहीर; सतर्कतेचे आवाहन
या परतीच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांतील शेतजमीनी जलमय झाल्या आहेत. नद्यांवर बांधण्यात आलेल्या पुलांचं पाणी शेतात शिरल्याचं चित्र आहे.. मानेवाडी येथील बंधारा फुटल्याने अंमळनेर-पाथर्डी रस्त्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. काही प्रमाणात हा पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झालीयं.
मागील 15 तासांपासून पाथर्डी तालुक्यात पाऊस सुरुच आहे. यंदा आलेला हा परतीचा पाऊस ना भुतो ना भविष्यती असा आहे. मागील 80 वर्षांत असा पाऊस कधीच झालेला नाही. या पावसामुळे सोयाबीन, उडीद बाजरी मका, संत्रा संपूर्ण पिकांचं नुकसान झालं असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांची जमीनच शिल्लक राहिली नाही, सर्व जमीन पाण्याखाली वाहून गेलीयं, असं शेतकऱ्यांनी लेट्सअपशी बोलताना सांगितलंय.
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? टीम इंडियाच्या गोटात तणाव; कोच गंभीरने..
500 वेळा पंचनामे झाले पण दमडीही दिली नाही…
सध्याची परिस्थिती पाहून सरकारने शेतकऱ्यांची मदत करायला हवा. आमची जमीनच आतात राहिलेली नाही. काळजी असेल तरच सरकारने मदत द्यावी, अद्याप प्रशासनाकडून एकही माणूस साधं पाहायलाही आलेला नाही. देवाची कृपा म्हणून आमचं गाव वाचलंय. प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. आत्तापर्यंत 500 वेळा पंचनामे झाले आहेत पण सरकारने दमडीही दिलेली नसल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
गरिब खासदार-आमदारांना गिफ्ट! म्हाडाच्या सोडतीत 113 घरं राखीव
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून राज्यातील छत्रपती संभाजीनगर, पुणे , अहिल्यानगर, जालना भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलायं. या पावसामुळे शेतकऱ्यांचं कधीही भरुन न निघणारं नुकसान झालं आहे. सरकारने तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून सध्या केली जात आहे.
दरम्यान, कालपासून राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. अशातच आता पुढील दोन दिवसही मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.