Sangram Jagtap : ताबेमारी प्रकरणावरून संग्राम जगताप आक्रमक…थेट पोलीस अधीक्षकांना निवेदन
Sangram Jagtap : नगर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये ताबेमारीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान असाच काहीसा प्रकार नगर शहरात घडल्याने नगर शहराचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी आज पोलीस अधीक्षक राकेश ओला (Rakesh Ola) यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे.
नगर तालुक्यातील वाटेफळ येथील अनिल वालचंद गांधी, विजय वालचंद गांधी, बाबुर्डी येथे सुदर्शन डुंगुरवाल आणि वाकोडी येथे धनेश कोठारी यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करत राजरोजपणे पाल टाकण्याचे काम केले जाते. त्याच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटित होऊन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. तसेच निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली.
Bank Holidays January 2025: जानेवारीत 15 दिवस बँका राहणार बंद, ‘हे’ आहे कारण
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नगरच्या आजूबाजूच्या परिसरात आमच्या व्यापारी बंधूंच्या शेत जमिनीवर विशिष्ट समाजाकडून जाणीवपूर्वक पैशांची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आज आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयात नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. तसेच ताबा मारणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी दिली.