Bank Holidays January 2025: जानेवारीत 15 दिवस बँका राहणार बंद, ‘हे’ आहे कारण
Bank Holidays January 2025: नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात जर तुम्हाला बँकांशी संबंधित कोणतेही महत्वाचे काम असेल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. माहितीनुसार, जानेवारी महिन्यात तब्बल 15 दिवस बँका बंद राहणार आहे. देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने (RBI) दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2025 मध्ये साप्ताहिक सुट्ट्या आणि राष्ट्रीय किंवा प्रादेशिक सुट्ट्यांसह जानेवारीत 15 दिवस बँका बंद राहणार आहे. नुकतंच आरबीआयने बँक सुट्ट्यांची (Bank Holiday) यादी प्रसिद्ध केली आहे.
या यादीनुसार, जानेवारी महिन्यात देशभरातील बँका राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी बंद राहणार असून तर प्रादेशिक सुट्ट्या केवळ विशिष्ट राज्यांना लागू होणार आहे. तर दुसरीकडे ग्राहक सुट्टीच्या दिवशी ऑनलाइन बँकिंग वापरू शकतात. मात्र जर ग्राहकांला मोठी रोख रक्कम काढणे, चेक क्लिअरन्स आणि इतर बँकिंग कामांसाठी थांबावे लागेल.
जानेवारी 2025 मध्ये भारतात बँक सुट्ट्या
01 जानेवारी : बुधवारी नवीन वर्षाच्या दिवशी देशभरात बँका बंद राहतील.
02 जानेवारी : मिझोराम आणि केरळमध्ये गुरुवारी, नवीन वर्षाची सुट्टी, मन्नम जयंती या दिवशी बँका बंद राहतील.
05 जानेवारी: साप्ताहिक सुट्टी म्हणजे रविवारी आठवड्याची सुट्टी.
06 जानेवारी : गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त सोमवारी पंजाबसह काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
11 जानेवारी : दुसरा शनिवार, देशभरातील बँका बंद राहतील.
12 जानेवारी : स्वामी विवेकानंद जयंती रविवारी, साप्ताहिक सुट्टी म्हणजे आठवड्याची सुट्टी.
13 जानेवारी : लोहरी सणानिमित्त सोमवारी पंजाब आणि इतर काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
14 जानेवारी : तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये मंगळवारी संक्रांती आणि पोंगलमुळे बँका बंद राहतील.
15 जानेवारी : तिरुवल्लुवर दिनानिमित्त तुसू पुजेमुळे बुधवारी तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाममधील बँकांना सुट्टी असेल.
19 जानेवारी : रविवारी सर्व राज्यांमध्ये साप्ताहिक सुट्टी.
22 जानेवारी : इमॉइनमुळे मणिपूरमध्ये गुरुवारी बँका बंद राहतील.
23 जानेवारी : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी अनेक राज्यांमध्ये बँका सुरू राहणार नाहीत.
25 जानेवारी : शनिवारी साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरात बँका बंद राहतील.
26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
राखेचा धंदा करण्यासाठी तुम्हाला पिस्तुल लागतात का? सुरेश धसांचा पुन्हा बीडच्या ‘आकां’वर निशाणा
30 जानेवारी : सोनम लोसारमुळे सिक्कीममध्ये गुरुवारी बँका बंद राहतील.