डिसेंबर महिन्यात भरमसाठ सुट्ट्या, बॅंका किती दिवस बंद राहणार? एका क्लिकवर घ्या जाणून

डिसेंबर महिन्यात भरमसाठ सुट्ट्या, बॅंका किती दिवस बंद राहणार? एका क्लिकवर घ्या जाणून

December 2024 Bank Holiday Schedule : उद्यापासून डिसेंबर महिना सुरू होत आहे. 2024 या वर्षातील अखेरचा महिना म्हणून डिसेंबरकडे (December 2024 Bank Holiday) पाहिलं जातं. या महिन्यात देशभरात राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या आहेत, त्यामुळे या महिन्यात देशभरात जवळपास 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. डिसेंबर महिन्यात रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, विविध सणांच्या दिवशी असलेल्या सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद (Bank Holiday Schedule) राहणार आहेत. डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात किती दिवस बॅंका बंद राहणार आहेत, हे आपण सविस्तर जाणून घेऊ या.

Video : EC म्हणजे कुत्रा; टीकेच्या ओघात काँग्रेस नेते भाई जगतापांचे बोल बिघडले

महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात विविध सुट्यांमुळे बँकांचे काम तब्बल आठ दिवस बंद राहणार आहेत. मात्र, सगळ्याच सुट्ट्या सगळ्या राज्यांमध्ये समान नाही, त्यामुळे प्रत्येक राज्यात सुट्यांची संख्या वेगवेगळी (Bank Holidays In December) आहे. डिसेंबर महिन्यामध्ये एकूण 5 रविवार आले त. दुसरा आणि चौथ शनिवार धरून 7 साप्ताहिक सुट्या बँक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे नाताळ आणि काही स्थानिक सण-उत्सव यांच्या देखील सुट्ट्या आहेत.

“आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही हीच आमची..” EVM वर शरद पवारांचाही अविश्वास

ग्राहक सुट्टीच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्म, इंटरनेट बँकिंग, मोबाईल अॅप, एटीएम यासारख्या बॅंकिंग सेवांचा वापर करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ऑनलाईन सेवांचा वापर करून ग्राहकांना एटीएममधून पैसे काढता येणार आहे. यूजर्स गुगल पे, फोन पे, पेटीएम यासारख्या सेवा मात्र सुरू राहणार आहेत.

महाराष्ट्रात बँकांना किती दिवस सुट्ट्या : 

1 डिसेंबर – रविवार
8 डिसेंबर – रविवार
14 डिसेंबर – दुसरा शनिवार
15 डिसेंबर – रविवार
22 डिसेंबर – रविवार
25 डिसेंबर – नाताळ
28 डिसेंबर – चौथा शनिवार
29 डिसेंबर – रविवार

बँकांच्या सुट्ट्यांची यादी :

1 डिसेंबर – रविवार (संपूर्ण देशभर)
3 डिसेंबर – शुक्रवार (गोवा)
8 डिसेंबर- रविवार (संपूर्ण देशभर)
12 डिसेंबर – मंगळवार (मेघालय)
14 डिसेंबर – दुसरा शनिवार (संपूर्ण देशभर)
15 डिसेंबर – रविवार (संपूर्ण देशभर)
18 डिसेंबर -बुधवार (मेघालय)
19 डिसेंबर – गुरुवार ,गोवा मुक्ती दिन(गोवा)
22 डिसेंबर – रविवार (संपूर्ण देशभर)
24 डिसेंबर -मंगळवार (मिझोरम, नागालँड आणि मेघालय) ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सुट्टी
25 डिसेंबर – बुधवार (संपूर्ण देशभर) ख्रिसमस
26 डिसेंबर – गुरुवार (मिझोरम,नागालँड, मेघालय) ख्रिसमस सण साजरा करण्यासाठीसुट्टी
27 डिसेंबर – शुक्रवार (मिझोरम,नागालँड, मेघालय) ख्रिसमस सण साजरा करण्यासाठीसुट्टी
28 डिसेंबर – रविवार (संपूर्ण देशभर)
30 डिसेंबर – सोमवार (मेघालय )
31 डिसेंबर- मंगळवार (मिझोरम आणि सिक्कीम)

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या