काही ठिकाणी सोमवारी, काही ठिकाणी मंगळवारी…बॅंकांना दिवाळीच्या चार दिवस सुट्ट्या, तुमच्या शहरात कधी बंद?
दिवाळी 2025 च्या पार्श्वभूमीवर देशभरातील बँक सुट्ट्यांबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.

Diwali 2025 Bank Holiday Date : दिवाळी 2025 च्या पार्श्वभूमीवर देशभरातील बँक सुट्ट्यांबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. काही राज्यांमध्ये सोमवार, 20 ऑक्टोबर दिवाळी साजरी केली जात आहे, तर काहींमध्ये मंगळवार, 21 ऑक्टोबर दिवाळीचा दिवस आहे. या बदलामुळे बँकिंग सेवा राज्यानुसार वेगवेगळ्या दिवशी बंद राहतील. फेस्टिव्हल सीझनमध्ये बँकिंगचे महत्वाचे काम असेल तर नागरिकांनी आपल्या शहरातील सुट्टीची माहिती आधी तपासणे गरजेचे आहे, अन्यथा कामात अडथळा येऊ शकतो.
20 ऑक्टोबर रोजी सुट्टी असलेली राज्ये
सोमवारी दिवाळी साजरी करणाऱ्या राज्यांमध्ये बँकिंग सेवा (Diwali 2025) पूर्णपणे बंद राहतील. या राDiwali 2025ज्यांमध्ये समावेश आहे: त्रिपुरा, गुजरात, मिजोरम, कर्नाटक, मध्य प्रदेश, चंडीगढ़, तमिळनाडू, उत्तराखंड, असम, (Bank Holiday Date) तेलंगाना, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ, नागालँड, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा, छत्तीसगड, झारखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश
21 ऑक्टोबर रोजी सुट्टी असलेली राज्ये
मंगळवारी दिवाळी साजरी करणाऱ्या राज्यांमध्ये बँक बंद राहतील. यामध्ये प्रमुख राज्ये : महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश
चार दिवसांच्या सुट्टींचे शेड्यूल
दिवाळीनंतर देखील बँक सुट्ट्या संपत नाहीत. फेस्टिव्हल सीझनमध्ये चार दिवस सलग सुट्टी असणार आहे:
22 ऑक्टोबर (बुधवार) – विक्रम संवत नववर्ष, बली प्रतिपदा, दीपावली, गोवर्धन पूजा:
गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्किम, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथे बँक बंद राहतील.
23 ऑक्टोबर (गुरुवार) – भाई दूज, चित्रगुप्त जयंती, निंगल चाकौबा:
गुजरात, सिक्किम, मणिपुर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश मध्ये बँकिंग ठप्प राहणार आहे.