आता या दोन दिवशीही बंद राहणार बॅंक?, फक्त 5 दिवसच होणार काम, काय आहेत नवे नियम?

Bank News : आजकाल अनेक क्षेत्रांमध्ये 5 दिवसांचा आठवडा म्हणजेच आठवड्यातून (Bank) फक्त पाच दिवस काम आणि शनिवार-रविवार साप्ताहिक सुट्टी असा नियम करण्यात आला आहे. आता बँकांमध्ये देखील असा नियम लागू होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता दर शनिवारी बँकांमध्ये सुट्टी असणार असल्याचं म्हटलं जातं होतं.
येणाऱ्या काळात बँका फक्त सोमवार ते शुक्रवार काम करतील. कारण सरकारी बँका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच बंद असतात. बँका पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारीही उघड्या असतात. बॅंक कर्मचाऱ्यांनी आता दर शनिवारी सुट्टी देण्याचा प्रस्ताव सरकारकडे केला होता. लोकसभेत या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाचे लेखी उत्तर देताना अर्थ मंत्रालयाने सांगितले की, बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांकडून सर्व शनिवारी बँका बंद राहाव्यात असा प्रस्ताव आला आहे.
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांनी संयुक्तपणे हा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे. या संघटनांचे म्हणणे आहे की यामुळे बँक कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कामाचे वातावरण आणखी सुधारेल. बँकांमध्ये आणखी एक नवीन नियम करण्यात येणार असल्याचं म्हटंल जात आहे. या नवीन महिन्यानुसार आता बँका आता आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करेल. याशिवाय आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. बँक कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी नक्कीच आहे. या नियमाच्या अंमलबजावणीमुळे बँक कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल असं म्हटलं जातं.
नोंदणीकृत अर्थात रजिस्टर पोस्टल सेवा होणार बंद; टपाल विभागाचे हे नवे निर्देश पाहा
इंडियन बँक्स फेडरेशन (IBA) आणि बँक कर्मचारी संघटनेत आठवड्यातून 5 दिवस काम करण्याचा आणि बँकेला 2 दिवस सुट्टीच्या नियमाबाबत आधीच करार झाला आहे.पण या कराराला आरबीआय आणि सरकारने अद्याप मान्यता दिलेली नाही. जर सरकार आणि आरबीआय या करारावर सहमत झाले तर बँकेला आठवड्यातून 5 दिवस काम असणार आहे . तसेच 2 दिवसांच्या सुट्टीचा नियम लवकरच लागू केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता बँक कर्मचारी फक्त मागणी करत आहेत आणि आशावादी आहेत.
बँकेत 5 दिवसांच्या कामाचा आणि 2 दिवसांच्या सुट्टीचा नियम आल्यानंतर बँकेची वेळ देखील बदलू शकते. सर्व बँका सकाळी 10:00 ऐवजी सकाळी 9:45 वाजता उघडतील. याशिवाय बँका सायंकाळी 4:00 ऐवजी 5:30 वाजता बंद होतील. यासाठी बँक कर्मचाऱ्यांना दररोज 45 मिनिटे अतिरिक्त काम करावे लागेल. सरकार आणि आरबीआयने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच बँकांमध्ये 5 दिवस काम आणि 2 दिवस सुट्टीचा नियम लागू करता येईल. जर सरकार आणि आरबीआय यावर सहमत झाले तर बँकांमध्ये नवीन नियम लागू करता येईल.
बँक कर्मचारीही या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2015 मध्ये सरकार आणि आरबीआयने बँकेत दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टीची मागणी मान्य करून हा नियम लागू केला होता. आता पुन्हा कर्मचाऱ्यांनी बँकेत 5 दिवस काम असेल आणि आठवड्यातून दोन दिवस सुट्टीचा नियम लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता सरकार आणि आरबीआय या संदर्भात काय आणि केव्हा निर्णय घेतील हे पाहणं फार महत्त्वाचं आहे.