नोंदणीकृत अर्थात रजिस्टर पोस्टल सेवा होणार बंद; टपाल विभागाचे ‘हे’ नवे निर्देश पाहा…

नोंदणीकृत अर्थात रजिस्टर पोस्टल सेवा होणार बंद; टपाल विभागाचे ‘हे’ नवे निर्देश पाहा…

India Post to Say Goodbye to Registered Post : भारतीय टपाल विभागानं १ सप्टेंबर २०२५ पासून नोंदणीकृत अर्थात रजिस्टर पोस्टल सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे, १८५४ पासून सुरु असलेली ही नोंदणीकृत सेवा इतिहासजमा होणार. पाच दशकांहून अधिक काळ चालत आलेला हा वारसा आता संपुष्टात येणार आहे. टपाल विभागाच्या कामकाजाचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीन केली जाईल. त्यामुळे आता महत्त्वाची कागदपत्रं आणि पार्सल पाठवण्याचा एकमेव पर्याय असेल स्पीड पोस्ट.

गुडन्यूज! EMI वाढणार नाही, रेपो रेट ‘जैसे थे’; आरबीआयचा मोठा निर्णय

विश्वसनीयता, परवडणारे दर आणि कायदेशीर वैधतेसाठी ओळखले जाणारी नोदणीकृत पोस्टल सेवा ही कायदेशीर सूचना आणि अधिकृत संवाद यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे पोहोचवण्यासाठी दीर्घकाळापासून सर्वांच्याच पसंतीचं माध्यम राहिलं आहे. मात्र, ग्राहकांच्या बदलत्या सवयी आणि वाढत्या डिजिटायझेशनमुळे, सेवेचा वापर झपाट्याने कमी झाला आहे. २०११-१२ पासून नोंदणीकृत पोस्टल सेवेच्या वापरकर्त्यांत सातत्याने घट होत असल्याचं इंडिया पोस्टच्या आकडेवारीवरून दिसून येते. नोंदणीकृत टपालांची संख्या २०११-१२ मध्ये २४४.४ दशलक्ष होती ती २०१९-२० पर्यंत १८४.६ दशलक्ष झाली – कोविड-१९ साथीच्या आजाराने डिजिटल कम्युनिकेशनला गती मिळाली मात्र, त्यापूर्वीच ही घट झाली.

Jasprit Bumrah वर बीसीसीआय नाराज; गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा मोठा निर्णय

खाजगी कुरिअर्स कंपण्यांची वाढती स्पर्धा, ई-कॉमर्स लॉजिस्टिक्सचा विस्तार आणि ऑनलाइन कम्युनिकेशन चॅनेलचा वाढता वापर यामुळे ही घसरण दिसून येते. स्पीड पोस्ट सेवेत आता याचं विलीनीकरण होणार आहे. टपाल विभागाचे सचिव आणि महासंचालकांनी सर्व सरकारी विभाग, न्यायालये, शैक्षणिक संस्था आणि नियमित वापरकर्त्यांना पुढील महिन्यापासून नवीन प्रणाली वापरण्याचे निर्देश दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोंदणीकृत पोस्टची मुख्य वैशिष्ट्ये – जसे की सुरक्षित आणि पुष्टी करता येणारी डिलिव्हरी – स्पीड पोस्ट सेवेत अबाधित राहील.

पतीकडून 12 कोटींसह गडगंज संपत्तीची पोटगी मागणाऱ्या महिलेला कोर्टाने फटकारलं, ते घ्या अन्यथा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube