भारतीय टपाल विभागात मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची संधी

भारतीय टपाल विभागात मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची संधी

Job Recruitment : भारतीय टपाल विभागात मोठी भरती होणार आहे. (Job Recruitment) दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. (Job) यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे

या राज्यांचा समावेश  मोठी बातमी! कॉ. पानसरे खूनप्रकरणी तावडेचा जामीन रद्द, तात्काळ ताब्यात घेण्याचे कोर्टाचे आदेश

यासाठी देशभरात एकूण ४४,२२८ जागा असून यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, इशान्य ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या २२ राज्यांचा समावेश आहे.

रिक्त जागा : 44,228 

  • रिक्त पदाचं नाव : ग्रामीण डाक सेवक
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवार 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 –40 वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
  • परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस : 100 रुपये (एससी/एसटी उमेदवारांना फी नाही)
  • पगार : 10,000 रुपये ते 29,380 रुपये
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024

निवड प्रक्रिया

  • या भरतीसाठी निवड प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश आहे
  • टप्पा 1: गुणवत्ता यादी.
  • टप्पा 2: दस्तऐवज पडताळणी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube