Railway Job : भारतीय रेल्वेत 4660 पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 52 हजार रुपये पगार

Railway Job : भारतीय रेल्वेत 4660 पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 52 हजार रुपये पगार

Indian Railway Recruitment 2024 : अनेक तरुणांचे सरकारी नोकरीचे (Government job) स्वप्न असते. तुमचंही सरकारी नोकरीचं (Railway Job) स्वप्न असेल तर तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, भारतीय रेल्वेने (Indian Railways) कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 4660 पदांसाठी ही भरती आहे. यासाठी वयोमर्यादा किती आहे? शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज कुठे करायचा? निवड प्रक्रिया काय आहे? याच विषयी जाणून घेऊ.

‘नुसतं मी-मी करून चालत नाही’; गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक टोला 

भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. त्यामुळं रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. दरम्यान, या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे, त्यापूर्वी तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावा लागेल.

प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या Anil Kapoor च्या ‘1942: अ लव्ह स्टोरी’ ला 30 वर्षे पूर्ण 

शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून 10वी उत्तीर्ण केलेली असावी. तर सब-इन्स्पेक्टर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅजलर डिग्री घेतलेली असावी.

वयोमर्यादा
या दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. त्यासाठी वयाचा दाखला सादर करावा लागणार आहे.

निवड प्रक्रिया काय आहे?

रेल्वेच्या या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा (CBT 1 आणि CBT 2), शारीरिक चाचणी आणि शेवटी कागदपत्र पडताळणी उत्तीर्ण करावी लागेल. या प्रत्येक टप्प्यात पात्र ठरलेले उमेदवार या पदासाठी पात्र ठरतील. यानंतर उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल.

अर्जाची तारीख आणि वेबसाइट
उमेदवारांना RPF कॉन्स्टेबल किंवा सब-इन्स्पेक्टर पदांसाठी १५ एप्रिल २०२४ ते १४ मे २०२४ या कालावधीत rrbapply.gov.in या वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे.

अर्ज फी
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी फी 500 रुपये आहे, तर एससी, एसटी, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी फी 250 रुपये आहे. हे शुल्क ऑनलाइन भरता येते.

पगार
RPF SI म्हणून निवडलेल्या उमेदवारांना सुमारे 43,000 रुपये आणि 52,000 रुपये प्रति महिना वेतन मिळेल. तर आरपीएफ कॉन्स्टेबलना 37,235 रुपये ते 41,141 रुपये प्रति महिना पगार मिळेल.

अर्ज कसा करायचा?
1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जा.
2. नोकरी विभागावर क्लिक करा आणि संबंधित पोस्ट (कॉन्स्टेबल किंवा सब-इन्स्पेक्टर) निवडा.
3. मूलभूत माहिती भरून आणि वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करून नोंदणी करा.
4. वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
5. सर्व आवश्यक तपशीलांसह अर्ज योग्यरित्या भरा.
6. शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळख पुरावा आणि फोटोसह इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, अर्जाची फी ऑनलाइन भरा.
7. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि सबमिट करा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube