‘नुसतं मी-मी करून चालत नाही’; गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक टोला
Girish Mahajan On Eknath Khadse : नुसतंच मी-मी करुन चालत नाही, पक्षाशिवाय कोणाची मोठा नाही, तुम्ही बाहेर पडलेत त्यामुळे तुमचं भविष्य कसंय ते पाहा, या शब्दांत भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, जळगावमध्ये आयोजित सभेत गिरीश महाजन बोलत होते.
Ayodhya Ram Mandir सोहळ्यानंतर राज्यातील राम मंदिरांमध्ये गर्दी वाढली; दानात दीडपट वाढ
गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले, नुसतं मी-मी करून चालत नाही, पक्षाशिवाय दुसरा कोणीही मोठा नाही. मला वाटतं ज्याचं पुण्य संपलं तो आमच्या पक्षातून बाहेर गेला. तुम्ही आता बाहेर गलेले आहात, आता बघा तुमची अवस्था काय होतेय. तुमचं भविष्य कसं आहे ते पाहा..पक्षात मी मी म्हणणारे काही जण होते, पण आता त्यांची अवस्था काय झालीय ते पाहा, अशी खोचक टोलेबाजी गिरीश महाजन यांनी केली आहे.
तसेच ज्यांनी ३० ते ३५ वर्षे आमदारकी उपभोगली तब्बल २० वर्षे लाल दिव्याच्या कारमधून फिरले माझ्यामुळेच पक्ष आहे, मी आहे म्हणून भाजपा आहे, मी आहे म्हणून बँक आहे, दूध डेअरी आहे. माझ्यामुळेच सर्वकाही आहे. अशा अविर्भावात असणारे नेते आता कुठे पडलेत ते सर्वांना माहिती असल्याचंही गिरीश महाजन म्हणाले आहेत.
माझ काय वय झालं का? म्हणणारे शरद पवार प्रचाराच्या मैदानात! महाराष्ट्रभर सभांचा धडाका
अन्याय झालायं म्हणण्याला काहीच अर्थ नाही…
निवडणुकीत एकदा पडल्यामुळे लगेच दुसऱ्या वर्षी त्यांनी पक्ष बदलला. त्यामुळे ३५ वर्ष वाया गेली. याचा अर्थ तुमची पक्षाविषयी काहीच निष्ठा नाही. माझ्यावर अन्याय झालाय, असं म्हणण्याला काहीच अर्थ नाही. मुळात पक्ष आहे म्हणून आपल्याला किंमत आहे, पक्ष आहे म्हणून आपण असल्याचंही महाजनांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
पक्षात निष्ठेला अधिक महत्व…
उद्या गिरीश महाजनला असं काही वाटलं, त्याच्या मनात असं काही आलं तर हे सगळं शून्य होईल. तुम्ही मतदारसंघात कितीही कामं करा, लोकांना काहीही सांगा, तरी पक्ष महत्त्वाचा आहे. निष्ठेला खूप महत्त्व आहे. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना आपण आजवर तिकीट दिलं असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरु आहेत. या चर्चांना अखेर एकनाथ खडसे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन फुलस्टॉप दिला होता. एकनाथ खडसेंनी अनेक वर्षे भाजपात घालवली आहेत. त्यामुळे आता त्यांनी भाजपात यावं, अशी गळ अनेक भाजप नेत्यांनी घातली असल्याचं खडसेंनी सांगितलं होतं. मात्र, त्यांचा अद्याप भाजपप्रवेश झालेला नाही.