Revenge Quitting : नववर्षात अनेक कर्मचाऱ्यांचा नोकरीला ‘रामराम’; ‘रिवेंज क्विटिंग’ चा ट्रेंड चर्चेत…
What Is Revenge Quoting Trend On Workplace : एकीकडे अनेक तरुण नोकरीच्या शोधात भटकत आहेत, तर दुसरीकडे तेवढ्याच संख्येने अनेक कर्मचारी कंपन्यांना थेट रामराम करत आहे. नव वर्षांच्या म्हणजेच 2025 मध्ये आलेल्या या नव्या ट्रेंडला ‘रिवेंज क्विटिंग’ असे संबोधले जात आहे. याबाबत Glassdoor च्या वर्कलाइफ ट्रेंड्सने एक अहवाल प्रकाशित केला आहे. नेमका हा ट्रेंड काय आहे? ‘रिवेंज क्विटिंग’ म्हणजे काय? त्याची कारणं काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया.
भारतीयांना अमेरिकेची भुरळ! दरवर्षी लाखो भारतीय सोडताहेत मायदेश; कारणंही धक्कादायक
अहवाल नेमकं काय सांगतो?
Glassdoor च्या वर्कलाइफ ट्रेंड्स 2025 च्या अहवालानुसार, मोठ्या संख्येने नोकरी सोडण्यामागे अनेक कारणे आहेत. ज्यात प्रामुख्याने एकाच ठिकाणी काम करून आलेली निराशा, एकाच नोकरीत अडकल्याची भावना अशा विभिन्न कारणांचा समावेश आहे. शिवाय विकासित होण्याचा अभाव, ऑफिसमधील राजकारण किंवा सह कर्मचारी किंवा वरिष्ठांकडून सातत्याने मिळणारी अपमानास्पद वागणूक या कारणांचाही समावेश आहे. त्यामुळेच अनेक तरूण किंवा नोकरदार वर्ग अशा नोकरीत टिकून राहण्याऐवजी ‘रिवेंज क्विटिंग’ चा पर्याय निवडू लागले आहेत.
Glassdoor च्या वर्कलाइफ ट्रेंड्स 2025 च्या अहवालानुसार 65% कर्मचाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या नोकरी असेलल्या भूमिकेत अडकल्यासारखी भावना वाटत आहे. ही भावना वाढत गेल्यास वर्षभरात ‘रिव्हेंज क्विटिंग’ मध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, सॉफ्टवेअर फाइंडरनेच्या सर्वेक्षणात 28% पूर्ण-वेळ कर्मचारी यावर्षी त्यांच्या कामाच्या ठिकाणी रिवेंज क्विटिंग करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे.
शिवाय 7 टक्के हायब्रिड कर्मचारी, 6 टक्के मॅनेजर्स तर, 16 टक्के मार्केटिंग आणि जाहिरात विभागातील कर्मचारी रिवेंज क्विटिंग करण्याच्या मानसिकतेत असून, आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ही टक्केवारी 11 टक्के तर, मीडिया आणि मनोरंजन 7 टक्के कर्मचारी या ट्रेंडच्या माध्यमातून 2025 मध्ये नोकरीला रामराम करण्याच्या मानसिकतेत असल्याचे म्हटले आहे.
67 लाख 50 हजारांचे बक्कळ पॅकेज देणारी सरकारी नोकरीची जाहिरात निघाली, वाचा डिटेल्स
रिवेंज क्विटिंग का म्हटले जाते ?
या ट्रेंडला ‘रिवेंज क्विटिंग’ असे नाव देण्यात आले आहे. या मागचे मुख्य कारण फक्त नोकरी सोडण्यापुरते मर्यादित नाहीये तर, त्यामागे बदला म्हणजेच सूड घेण्याचीही भावना लपलेली आहे. अनेक कर्मचारी सोशल मीडियावर व्यक्त होताना करत असलेल्या नोकरीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम झाला आहे त्याबद्दल जागरूक करत अशा नोकऱ्यांपासून लांब राहण्याचा सल्ला देत आहे.
तज्ज्ञांकडून कंपन्यांना मोलाचा सल्ला
नव वर्षात आलेल्या वाढत चाललेल्या ‘रिवेंज क्विटिंग’ ट्रेंडबाबत तज्ज्ञांनी कंपन्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, जर तरुणांना सोबत काम करण्यासाठी टिकवून ठेवायचे असेल, तर वर्क-लाइफ बॅलन्सला प्राधान्य देण्याबरोबरच व्यावसायिक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता ‘रिवेंज क्विटिंग’ ट्रेंडमधून लहान-मोठ्या कंपन्या कशा प्रकारे मार्ग काढतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.