Jasprit Bumrah वर बीसीसीआय नाराज; गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah वर बीसीसीआय नाराज; गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा मोठा निर्णय

BCCI on Jasprit Bumrah : इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका (IND vs ENG) अखेर अनिर्णित राहिली. पाचवा आणि शेवटचा सामना टीम इंडियाने (Team India) अवघ्या सहा धावांत जिंकला. यानंतर आता स्टार गोलंदाज जसप्रित बुमराहबाबत मोठी बातमी (Jasprit Bumrah) समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार आता कोणत्याही खेळाडूला सामना निवडण्याची परवानगी दिली जाणार नाही. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी हा निर्णय घेतला आहे.

दोघांचेही म्हणणे आहे की आता संघात कोणतेही मेगा कल्चरची गरज नाही. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक मोठ्या सामन्यासाठी उपलब्ध राहावे लागेल. पीटीआयच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की या मुद्द्यावर चर्चा झाली आणि करारात सहभागी असणाऱ्या खेळाडूंना सांगण्यात आले आहे की ते आता त्यांच्या मर्जीनुसार सामना निवडू शकणार नाहीत.

बीसीसीआय बुमराहवर नाराज

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यात बुमराह खेळलाच नाही. त्याचं वागणं बीसीसीआयला आजिबात आवडलं नाही अशा चर्चा सुरू आहेत. यामुळे बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सिलन्समध्ये काम करणाऱ्या टीमवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की असे नाही की खेळाडूंच्या कामाच्या ताणाकडे दुर्लक्ष केले जाईल. परंतु, या गोष्टीचा बाऊ करून खेळाडू महत्वाच्या सामन्यांना टाळू शकत नाहीत.

ब्रेकिंग : ओव्हल कसोटीत भारताने रोमांचक विजय मिळवत मोडला इंग्लंडचा घमंड; मालिका बरोबरीत

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला अडचणी जाणवत असतानाही त्याने चौथ्या कसोटीपर्यंत चांगली कामगिरी केली. त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटला आपल्या सवडीप्रमाणे घेता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, याचवेळी बीसीसीआयने गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात गंभीर टीम कल्चरवर जोर देताना दिसत आहे.

संघात परिश्रम आणि प्रदर्शनात सुधारणा असावी असे गंभीरला वाटते. खेळाडू येत जात राहतील परंतु संघाचा विचार आणि वातावरण बदलायला नको असे गौतम गंभीरला वाटते. जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर टीम इंडिया टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी राहील. या पद्धथतीने टीममधील वातावरण असावे असे त्यांना वाटते. आता त्यानुसार निर्णय घेतले जात आहेत.

ओव्हल कसोटीत सिराज-कृष्णा चमकले, भारताचा शानदार विजय

follow us
  • fb
  • instagram
  • youtube