ओव्हल कसोटीत सिराज-कृष्णा चमकले, भारताचा शानदार विजय

ओव्हल कसोटीत सिराज-कृष्णा चमकले, भारताचा शानदार विजय

INDvsENG : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफीच्या (Anderson-Tendulkar Trophy) पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात बाजी मारली आहे. या सामन्यात शेवटच्या दिवशी इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता होती मात्र मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) शानदार गोलंदाजी करत भारताला या सामन्यात विजय मिळवून दिला.

या सामन्यात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने 5 विकेट्स घेतले तर  कृष्णाने 4 विकेट्स घेत भारताला विजय मिळवून दिला आहे.  इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 374 धावांची आवश्यकता होती मात्र सिराज आणि कृष्णाच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने हा सामना 6 धावांनी जिंकला आहे.

ही मालिका 3-1 ने जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर 374 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात हॅरी ब्रुक आणि जो रूट यांनी आपल्या शतकांसह इंग्लंडला विजयाच्या जवळ आणले परंतु भारतीय गोलंदाजांनी चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात आणि नंतर पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात शानदार गोलंदाजी केली आणि रोमांचक सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. सिराजने पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात तीन फलंदाजांना बाद केले. त्याने जेमी स्मिथ, ओव्हरटन आणि शेवटी अ‍ॅटकिन्सनला बाद केले. यासोबतच त्याने पाच विकेटही घेतल्या. त्याने जॅक आणि ऑलीलाही बाद केले.

पाचव्या कसोटी सामन्यात सिराजने दुसऱ्या डावात 5 घेत सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या तर प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेत सामन्यात एकूण 8  विकेट्स घेतल्या.

मोठी बातमी, भारत – पाकिस्तान सामना होणार नाही; PCB ची घोषणा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube