जो रुट चमकला…, झळकावले कारकिर्दीतील 38 वे शतक अन् मोडले अनेक विक्रम

Joe Root 38th Test Century : अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफीच्या (Anderson-Tendulkar Trophy) चौथ्या सामन्यात इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट (Joe Root) चमकला असून त्याने कारकिर्दीतील 38 वे शतक झळकावले आहे. मँचेस्टर येथे सुरु असणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात 176 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने शकत पूर्ण केले आहे. बातमी लिहिताना तो नाबाद 121 धावांवर खेळत आहे. शतक पूर्ण करत जो रुटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे.
कुमार संगकाराची बरोबरी
आज रूटचे कसोटी कारकिर्दीतील 38 वे शतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत, रूट श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकारासह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. रूटने त्याच्या कारकिर्दीच्या 157 व्या कसोटी सामन्यातील 286 व्या डावात 38 वे शतक ठोकले. तर संगकाराने 134 कसोटी सामन्यांपैकी 233 डावात 38 शतके ठोकली आहेत. कसोटी शतकांच्या बाबतीत रूट आता सचिन तेंडुलकर (51), जॅक कॅलिस (45) आणि रिकी पॉन्टिंग (41) यांच्या मागे आहे.
Water is wet.
Joe Root has a hundred.🤝 @IGCom pic.twitter.com/GP5UknjIXA
— England Cricket (@englandcricket) July 25, 2025
धावांच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला
जो रूटने त्याच्या शतकाच्या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या डावात 30 धावांचा टप्पा ओलांडताच, रूटने राहुल द्रविड (13,288) यांना मागे टाकले आणि 31 धावा करताच, त्याने जॅक कॅलिस (13,289) यांना मागे टाकले. तर 120 धावा करताच त्याने रिकी पॉन्टिंगला (13,379) मागे टाकले आहे. रूट आता सचिन तेंडुलकरनंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. सचिनने 15,921 धावा केल्या आहेत.
मँचेस्टरमध्ये केलेल्या एक हजार धावा
जो रूटने त्याच्या शतकाच्या खेळीदरम्यान मँचेस्टरमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. जो रूट हा जगातील पहिला फलंदाज आहे ज्याने हा टप्पा गाठला आहे. रूटने 22 धावांचा आकडा गाठताच ही अनोखी कामगिरी केली.
कोकाटे अखेर ‘रमी’ डावात हारलेच; धनंजय मुंडेंच्या पावलावर पाऊलं टाकत सोमवारी देणार राजीनामा?
भारताविरुद्ध सर्वाधिक शतके
भारताविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत जो रूटने स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. स्मिथने भारताविरुद्ध कारकिर्दीत 11 शतके झळकावली आहेत. रूटने चालू मालिकेतील दुसरे शतक झळकावून स्मिथला मागे टाकले आहे. भारताविरुद्ध त्याचे 12 कसोटी शतके आहेत.