कोकाटे अखेर ‘रमी’ डावात हारलेच; धनंजय मुंडेंच्या पावलावर पाऊलं टाकत सोमवारी देणार राजीनामा?

कोकाटे अखेर ‘रमी’ डावात हारलेच; धनंजय मुंडेंच्या पावलावर पाऊलं टाकत सोमवारी देणार राजीनामा?

Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात ऑनलाइन रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. या प्रकरणावरुन विरोधक राज्य सरकारवर चारही बाजूने टीका करताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सोमवारी राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मंगळवारी कॅबिनेटची बैठक असून त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील ट्विट करत कृषिमंत्री माणिकारव कोकाटे राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजितदादा दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का? बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, त्यांच्यावर देखील नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल. बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत शिंदे साहेब कधी दाखवणार? असं आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसंच काही मंत्री कोकाटे देखील करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मंत्री कोकाटे मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सोमवारी राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

पावसाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात कृषिमंत्री माणिकारव कोकाटे ऑनलाइन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यानंतर मंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यता येत आहे. तर दुसरीकडे आपण रमी खेळत नव्हतो असं स्पष्टीकरण मंत्री कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना दिले होते. मंत्री कोकाटे यांनी यापूर्वी देखील शेतकऱ्यांवर अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून सुरु असल्याने राज्य सरकार बॅकफूटवर असल्याचे दिसून येत आहे.

मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भातील राज्यात नविन मार्गदर्शक सूचना लागू; मंत्री नितेश राणेंची घोषणा 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube