‘अवकारीका’ तून रोहित पवारचे पदार्पण! मॉडेल-फॅशन कोरियोग्राफर रुपेरी पड‌द्यावर झळकणार

‘अवकारीका’ तून रोहित पवारचे पदार्पण! मॉडेल-फॅशन कोरियोग्राफर रुपेरी पड‌द्यावर झळकणार

Rohit Pawar’s debut with ‘Avkarika’! The model-fashion choreographer will be seen on the silver screen : मॉडेल आणि फॅशन कोरियोग्राफर रोहित पवार आता मराठी रुपेरी पड‌द्यावर झळकणार आहे. 1 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटात तो आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात अभिनेता विराट मडके सोबत तो स्क्रीन शेअर करणार आहे.

मोठी बातमी: धनंजय मुंडेंची वाईल्ड एन्ट्री तर कोकाटेंच्या राजीनाम्याची स्क्रीप्ट, वाचा नेमकं काय घडलं?

रेडबड मोशन पिक्चर या बॅनर अंतर्गत बनलेल्या ‘अवकारीका’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.

‘वेल डन आई’मध्ये विशाखा सुभेदारची धम्माल ‘या’ दिवशी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल बोलताना रोहित सांगतो की, “रेडबड मोशन पिक्चर सोबत माझं नातं खूप वर्षापासून आहे. माझ्या खडतर प्रवासात त्यांनी मला खूप आधार दिला. आर्थिक अडचणी आल्या, खूप अपमान सहन करावा लागला, पण माझं ध्येय मात्र अढळ राहिलं. ‘अवकारीका’ माझ्यासाठी फक्त एक चित्रपट नाही, तर माझं स्वप्न आहे. माणूस म्हणून मी समाजासाठी काय देऊ शकतो, हा विचार मला ‘अवकारीका’ने दिला. या चित्रपटात मी चेंबर साफ करणाऱ्या स्वच्छतादूताची भूमिका केली आहे. शूटिंगदरम्यान मी या कामगारांना जवळून पाहिलं, त्यांच्या डोळ्यातली हतबलता, वेदना, तरीही कामाप्रती असलेली निष्ठा हे सगळं पाहून मी हेलावून गेलो. हा चित्रपट करताना माझ्या डोळ्यात अनेकदा पाणी आलं. हा केवळ अभिनय नव्हता, तर त्यांच्या वेदनेचा, संघर्षाचा, आत्मसन्मानाचा एक अंश माझ्यात अनुभवण्याचा प्रवास होता.”

तब्बल 53 वर्षांची नाट्यसेवा! दिलीप जाधव यांना ‘नटवर्य केशवराव दाते’ पुरस्कार

या चित्रपटाची कथा-पटकथा, संवाद, गीते अरविंद भोसले यांची असून सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर, सुनिधी चौहान अन ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या सुरानी हा चित्रपट सजला आहे. स्वछता कामगारांची व्यथा कुशलतेने हाताळत, समाजाला आरसा दाखविणारा ‘अवकारीका’ हा चित्रपट येत्या १ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube