मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंची वाईल्ड कार्ड एन्ट्री अन् कोकाटेंच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट, वाचा नेमकं काय घडलं?

मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंची वाईल्ड कार्ड एन्ट्री अन् कोकाटेंच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट, वाचा नेमकं काय घडलं?

Manikrao Kokate and Dhananjay Munde: राज्याच्या मंत्रीमंडळात फेरबदलाचे वारे वाहायला सुरूवात झाली. शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंनाही नारळ मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे, मात्र यात लक्ष वेधलं ते एका बातमीनं ते म्हणजे धनंजय मुंडे यांना मिळालेली क्लीन चीट. मुंबई उच्च न्यायालयाने कृषी साहित्य खरेदी व वितरण निर्णय वैध ठरवत मुंडेंवरील 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले आहेत. कोणकोणत्या मंत्र्यांची विकेट जाणार? आणि कोणाची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? पाहूयात.

राज्याचे ८ मंत्री हे वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडले आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार की काय हे आता शिंदे आणि फडणवीसांच्या मोठ्या दिल्ली दौऱ्यावरून प्रथमदर्शनी वाटतंय. कारण, मागचे सर्व प्रकरणं पाहता, हे आमदार माजलेत, असं जनता म्हणत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात म्हटलं होतं. यावरून मुख्यमंत्र्यांना त्यांचे मंत्री आणि आमदार यांची वागणूक त्रासदायक वाटू लागली, हे स्पष्ट झालं. या मंत्र्यांमध्ये संजय शिरसाट, योगेश कदम, दादा भूसे, संजय राठोड हे शिंदेंचे तर माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या पक्षाचे मंत्री सध्या ऑक्सीजनवर आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त वक्तव्य आणि विधानभवनाच्या सभागृहात रम्मी खेळण्याच्या प्रकरणानं वादात आहेत. शेतकऱ्यांमध्ये, शेतकरी संघटनांमध्ये त्यांच्या बद्दल तीव्र संताप आहेच. या नंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, मी राजीनामा देण्यासारखं काहीच केलं नाही, मी सभागृहात रम्मी खेळत नव्हतो, मोबाईलमध्ये जाहिरात आली ती स्कीप करत होतो, असं माणिकराव कोकाटेंचं म्हणणं आहे. त्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोकाटे यांच्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांचा राजीनामा घेणार का, या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं….म्हणजेच काय तर कोकाटेंचं मंत्रीपद जाणार यात शंकाच नाही, असं म्हणता येते,

मागे एकदा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून असंच घडलं होतं, तेव्हाही मी त्यांना समज दिली होती. इजा झालं, बिजा झालं आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका असं मी माणिकराव कोकाटेंना सांगितलं आहे. माझी त्यांची आता जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मी काय कारवाई करायची ते बघेन, असे स्पष्ट शब्दात अजित पवारांनी सांगितले मात्र, बातमी ईथंच संपत नाही तर सुरू होते. त्याच पार्श्वभूमीवर दादांचे विश्वासू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र धनंजय मुंडे यांच्या वरील कृषी मंत्री असताना साहित्य खरेदी व वितरणात 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. आता कोकाटे जाऊन मुंडेंची मंत्रीमंडळात पुन्हा वाईल्ड कार्ड एन्ट्री होते की काय? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराडला अडक झाली, मात्र मुंडे हेच कराडचे आका असल्याचे आरोप झाले. देशमुख यांचे हत्ये नंतरचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 3 मार्चला संध्याकाळनंतर माध्यमांवरही हे फोटो प्रसारित झाल्यानंतर राजकारण तापलं होतं. यामुळे दबाव आल्यानं नैतीकतेच्या मुद्यावर मुंडेंनी राजीनामा दिला होता. राजीनाम्याचं हे कारण असताना कुठे तरी आता जनतेतला रोष कमी झाल्याचं समजून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस त्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री करतात का? हे येणाऱ्या काळात कळेलच.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube