ENG vs SL 2nd Test : जो रुटचे दुसऱ्या डावातही धमाकेदार शतक; लंकेला जिंकण्यासाठी हव्यात ‘चारशेपार’ धावा

  • Written By: Published:
ENG vs SL 2nd Test : जो रुटचे दुसऱ्या डावातही धमाकेदार शतक; लंकेला जिंकण्यासाठी हव्यात ‘चारशेपार’ धावा

England Vs Sri Lanka, 2nd Test, Lord’s : इंग्लड व श्रीलंकेत कसोटी मालिका खेळविली ( England Vs Sri Lanka) जात आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने श्रीलंकेचा धुव्वा उडविला होता. आता दुसऱ्या कसोटी इंग्लंडने लंकेसमोर विजयासाठी साडेचारशेहून अधिक धावांचे टार्गेट ठेवले आहे. प्रत्युत्तरात श्रीलंकेने तिसऱ्या दिवस अखेर दोन बाद 53 धावा केल्या आहेत. ही कसोटी जिंकण्यासाठी लंकेला 430 धावांची आवश्यकता आहे. तर इंग्लंडला दुसऱ्या विजयासाठी आठ गडी बाद करायचे आहेत.

संताप येणारच! पोलिसांनीच तरुणाच्या खिशात ठेवलं ड्रग्ज; सीसीटीव्हीनं सत्य केलं उघड..

तिसरा दिवस जो रुटने (Joe Root) गाजविला. इतर इंग्लंड फलंदाजांनी लंकेच्या गोलंदाजांसमोर लोटांगण घेतले. जो रुटने 121 चेंडूत 103 धावा करत शतक झळकविले. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार मारले. त्या व्यतिरिक्त बेन डकेटने 24, कर्णधार ओली पोपने 17 आणि हॅरी ब्रुकने 37 धावांची खेळी केली. विकेटकीपर जेमी स्मिथने चांगली खेळी करण्याचा प्रयत्न केला. त्याने 34 चेंडूत 26 धावा केल्या. तर क्रिस वोक्स हा अवघ्या 10 चेंडूत पाच धावा करू शकला. गस एटकिंसन 12 चेंडूत 14 धावा, तर मॅथ्यू पॉट्स हा दोन धावांवर बाद झाला. घरच्या मैदानावर श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज हे खास काही करू शकले नाहीत.

Horoscope Today: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांनी हितशत्रूंपासून सावध राहावे

फर्नांडो-लाहिरु कुमारची जबदरस्त गोलंदाजी
श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो आणि लाहिरु कुमाराने जबदरस्त गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. त्या व्यतिरिक्त मिलन रथनायके आणि प्रभात जयसूर्या यांनी प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले.

पहिल्या डावात इंग्लंडला आघाडी

पहिल्या डावात इंग्लंडने 427 धावांपर्यंत मजल मारली होती. या डावातही जो रुटनेही शानदार खेळी करत 143 धावा कुटल्या. तर गस एटकिंसनने 118 धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला लंकेसमोर सन्मानजक धावसंख्या उभारता आली. तर प्रत्युतरात श्रीलंकेलाही खास काही करता आले नाही. तर लंकेचा डाव 196 धावांवर आटोपल्याने इंग्लंडला 231 धावांची आघाडी मिळाली होती. इंग्लंडने दुसऱ्या डावात 251 धावा केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या