ICC Ranking : लाबुशेनला मागे टाकत जो रुट पुन्हा पोहोचला पहिल्या क्रमांकावर

ICC Ranking : लाबुशेनला मागे टाकत जो रुट पुन्हा पोहोचला पहिल्या क्रमांकावर

ICC Test Ranking :  अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या उस्मान ख्वाजा आणि जो रूटने आयसीसी क्रमवारीत मोठी प्रगती केली आहे. लाबुशेनला हटवून रूटने पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. लाबुशेनने सहा महिन्यांनंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गमावले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार खेळी करून लबुशेन कसोटी क्रमवारीत अव्वल फलंदाज बनला होता. यानंतरही त्याने चांगली कामगिरी सुरूच ठेवली, मात्रअ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात तो अपयशी ठरला. त्याचवेळी जो रूटने याच सामन्यात शतक झळकावून अव्वल स्थान काबीज केले.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

बर्मिंगहॅममध्ये जो रूटने नाबाद 118 आणि 46 धावा केल्या. त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी त्याने फलंदाजी चांगली केली. याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाला आणि तो पाच स्थानांच्या वाढीसह अव्वल स्थानी पोहोचला. या सामन्यात लाबुशेनने शून्य आणि १३ धावांचे योगदान दिले. त्याची आता तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. यासोबतच केन विल्यमसनने दोन स्थानांचा फायदा घेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

International Yoga Day: सेलिब्रिटींनी असा साजरा केला योग दिवस, सोशल मिडीयावर Video Viral

ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने 141 आणि 65 धावांची इनिंग खेळली होती. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. यानंतर तो कारकिर्दीतील सर्वोत्तम सातव्या क्रमांकावर पोहोचला. हॅरी ब्रूकनेही कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 13व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube