Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा
Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ (Adipurush) या बिग बजेटची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. 16 जून रोजी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला. काही नेटकऱ्यांनी या सिनेमाने कौतुक केलं तर काही लोक या सिनेमाला ट्रोल करत आहेत. आदिपुरुष या सिनेमातील डायलॉग्सवर देखील अनेकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. आता आदिपुरुष या सिनेमाचे संवाद लेखल मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांना मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली आहे.
Mumbai Police provides security to dialogue writer of #Adipurush, Manoj Muntashir after he sought a security cover citing a threat to his life. Police say that they are investigating the matter.
(File photo) pic.twitter.com/1WiWiOhclo
— ANI (@ANI) June 19, 2023
आदिपुरुष सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याची भीती मनोज यांनी पोलिसांकडे व्यक्त केली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनोज मुंतशीर यांना सुरक्षा देण्याचे ठरवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी यावेळी दिली आहे.
‘आदिपुरुष’ या सिनेमातील संवाद आणि कलाकारांच्या लूकवर काही लोकांनी टीका केली आहे. या सिनेमातील हनुमानाच्या डायलॉगवर देखील अनेकांनी मोठ्या प्रमाणात मोठा आक्षेप घेतला आहे. सिनेमातील हनुमानाच्या या डायलॉगविषयी मनोज म्हणाले की, ‘आजकालचे लोक या डायलॉगबरोबर जोडले जाणार म्हणून जाणूनबुजून तो डायलॉग तसा लिहिला आहे. ही गोष्ट सामान्य भाषेत सांगितली आहे. परंतु हनुमानजीबद्दलच का बोलले जात आहे? भगवान श्रीरामांच्या संवादांवर का बोलले पाहिजे.
Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?
तसेच माता सीतेच्या डायलॉगबद्दल देखील बोललं गेले पाहिजे. अभिनेता प्रभासनं आदिपुरुष या सिनेमात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली ‘आहे तर अभिनेत्री कृती सेनननं या सिनेमात सीता ही भूमिका साकारली आहे. ओम राऊतने आदिपुरुष या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
मनोज मुंतशीर हे गीतकार, कवी आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी अनेक हिट हिंदी सिनेमातील गाण्यांचे लेखन केले आहे. तेरी मिट्टी, तेरे संग यारा, कौन तुझे या गाण्यांचे लेखन मनोज यांनी केले आहे. मनोज मुंतशीर यांनी आदिपुरुष या सिनेमातील संवादांचे लेखन केले आहे.