SL vs ENG: गतविजेत्या इंग्लंडचे पॅकअप? लंकेकडूनही झाला मोठा पराभव

  • Written By: Published:
SL vs ENG: गतविजेत्या इंग्लंडचे पॅकअप? लंकेकडूनही झाला मोठा पराभव

World Cup 2023: वर्ल्डकपमधील (World Cup 2023) बेंगळुरू येथील सामन्यातही गतविजेत्या इंग्लंडचा (England) दारूण पराभव झाला आहे. लंकेने इंग्लंडवर (Sri Lanka) मोठा विजय मिळविला आहे. याचबरोबर इंग्लंडचे आता उपांत्यफेरीत दाखल होणे अवघड झाले आहे. गुणतालिका बघता इंग्लंडचे जवळजवळ पॅकअपच झाले आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडचे सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. त्यामुळे लंकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव हा 34 षटकांत 156 धावांत गुंडाळला. हे लक्ष्य लंकेने 25. 4 षटकांत दोन विकेट्सच्या बदल्यात गाठले.

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने ‘या’ तीन संघांना फायदा; टीम इंडियाचं काय?

लंकेकडून पाथुम निसंकाने 77 आणि सदीरा समीराविक्रमाने 65 धावांची नाबाद खेळी केली. गोलंदाज लाहिरू कुमारने तीन विकेट्स घेतल्या आहेत. लंका आतापर्यंत पाच सामने खेळली. त्यात दोनच विजय मिळविले आहे. तर इंग्लंड पाच सामन्यांत चार सामन्यांमध्ये हरली आहे. केवळ एक विजय मिळविता आला आहे. गतविजेत्या इंग्लंडसाठी ही शरमेची बाब ठरली आहे.

World Cup 2023 : इंग्लडने श्रीलंकेपुढे गुडघे टेकले; 156 धावांवर ऑलआऊट…

इंग्लंडचे केवळ दोन गुण असून, रन रेटही चांगला नाही. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. लंकेकडून पराभव झाल्याने इंग्लंडचे समीकरण बिघडले आहे. आता इंग्लंडचे चार सामने राहिले आहेत. त्यात तीन सामने बलाढ्य संघांबरोबर आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स व पाकिस्तान यांच्याबरोबर इंग्लंडचे उर्वरित सामने आहेत. त्यामुळे काही चमत्कार घडला तरच इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान टिकून राहू शकते.

World Cup 2023 : विश्वचषकातील सर्वात मोठा विजय; 400 धावांचे आव्हान देत ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सला 90 धावांत गुंडाळले

यंदाचा वर्ल्डकप इंग्लंडसाठी एकदम खराब राहिलेला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये इंग्लंड अपयशी ठरला आहे. डेविड मलान आणि जो रुट वगळता इंग्लंडचे इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहे. तर गोलंदाजही खास काही करू शकले नाहीत. जोस बटलर हा कर्णधार आणि फलंदाजीमध्ये अपयशी ठरली आहे. या सामन्यात जॉनी बेअरस्टोने 30, डॉविड मलान 28, बेन स्टोक्स् हा 43 धावा करू शकला. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. कर्णधार जोस बटलर तर आठ धावांवर बाद झाला.

वर्ल्डकपमध्ये 24 वर्षांपासून लंकेकडून इंग्लंडचा धुव्वा

वर्ल्डकपमध्ये श्रीलंका आणि इंग्लंड या संघात 1983 मध्ये पहिली लढत झाली. त्यानंतर 1999 पर्यंत इंग्लंडने लंकेला धूळ चारली आहे. परंतु वेस्ट इंडिजमधील 2007 च्या वर्ल्डकपमध्ये लंकेने इंग्लंडला पहिला धक्का दिला आहे. तेव्हापासून वर्ल्डकपमध्ये लंकेकडून इंग्लंड सपाटून मार खात आहे. 2007, 2011, 2015, 2019, 2023 वर्ल्डकपमध्ये लंकेकडून इंग्लंड पराभूत झाला आहे. विश्वचषकातील बारा सामन्यांमध्ये दोन्ही संघाने प्रत्येकी सहा सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube