World Cup 2023 : विश्वचषकातील सर्वात मोठा विजय; 400 धावांचे आव्हान देत ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सला 90 धावांत गुंडाळले

World Cup 2023 : विश्वचषकातील सर्वात मोठा विजय; 400 धावांचे आव्हान देत ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सला 90 धावांत गुंडाळले

World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सचा मोठ्या फरकाने पराभव केला. हा फरक एवढा मोठा होता की, ऑस्ट्रेलियाचा हा विजय विश्वचषकातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. कारण या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सला तब्बल 400 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र यामध्ये नेदरलॅंड्स अवघ्या 90 धावांत गुंडाळला गेला आहे.

विश्वचषकातील सर्वात मोठा विजय…

या समान्यामध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅक्सवेलने दमदार खेळी केली. त्याने यावेळी नेदरलॅंड्सच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करत अवघ्या 40 चेंडूत शतक केले. तर 44 चेंडूंमध्ये तो 106 धावांवर पोहचला. यात त्याने 9 चौकार आणि 8 षटकार लगावले. त्यामुळे त्याचा एक विक्रम झाला आहे. मॅक्सवेल आता विश्वचषकात सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला आहे. यावेळी डेव्हिड वॉर्नरनेही शतक केले. तर स्मिथनेही महत्त्वाची खेळी केली.

‘मराठा आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात पण..,’; शंभूराज देसाईंचं सूचक विधान

तर नेदरलॅंड्स बद्दल सांगायचे झाले तर त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या 400 धावांच्या आव्हाला पेलताना 21 षटकांत 90 धावा करून सर्वबाद झाले. यात सलामीवीर विक्रम जीत सिंगने 25 चेंडूत 25 धावांची खेळी केली. तर कॉलिन अकरमनने 11 चेंडूत 10 धावा, एंगलब्रेटने 21 चेंडूत 11 धावा केल्या अशा कामगिरीमुळे नेदरलॅंड्स अवघ्या 90 धावांत गुंडाळला गेला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube