World Cup 2023 : श्रीलंकेचा पराभव पण, धक्का पाकिस्तानला; आफ्रिकेने केला मोठा उलटफेर

World Cup 2023 : श्रीलंकेचा पराभव पण, धक्का पाकिस्तानला; आफ्रिकेने केला मोठा उलटफेर

World Cup 2023 : भारतात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) काल दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा दारूण (SA vs SL) पराभव केला. या विजयाने आफ्रिकेच्या संघाने स्पर्धेतील वाटचाल सुरू केली आहे. या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या संघाने धावांचा डोंगर उभा केला. दोन्ही संघांनी मिळून धावांचा पाऊस पाडला. आफ्रिकेने दिलेल्या 419 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंका संघानेही दमदार खेळ करत 326 धावा केल्या. आफ्रिकेने हा सामना जिंकत श्रीलंकेला नाही तर पाकिस्तानला मोठा फटका दिला.

या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संघाची ही रणनीती चुकली असेच म्हणावे लागेल. कारण आफ्रिकेच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. रॅसी व्हॅन डेर ह्युसेन (108) आणि क्विंटर डी कॉक (100) या दोघांनी 204 धावांची भागीदारी केली. एडन मार्करमने तर फक्त 49 चेंडूतच शतक ठोकले. तो 106 धावांवर बाद झाला.

World Cup 2023 : मार्करमने झळकविले वर्ल्ड कपमधील वेगवान शतक; लंकेसमोर 429 धावांचे लक्ष्य

मार्करमने 49 चेंडूमध्ये शतक झळकवत वर्ल्ड कपमधील वेगवान शतक करण्याचा विक्रम केला आहे. आफ्रिकेच्या मार्करमबरोबर रॅसी डर ह्युसेन आणि क्विंटन डी कॉकने जोरदार शतके झळकविली आहेत. ड्युसेनने 108 धावांची, तर कॉकने 100 धावांची खेळी केली आहे. या तीन शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 428 धावांचा डोंगर उभा केला. वर्ल्डकपचा इतिहासात एवढी मोठी धावसंख्या आफ्रिकेने उभारली आहे.

श्रीलंकेच्या संघानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. कुसल मेंडिस (76), चरिथ असलंका (79), दासून शनाका यांनी चांगल्या धावा काढल्या. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत अगदी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. त्याचा परिणाम असा झाला की श्रीलंकेला या धक्क्यातून सावरता आले नाही. आफ्रिकेच्या गेराल्ड कोएत्झीने 3 विकेट घेतल्या. तर मार्को यानसेन, कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या संघाला 44.5 ओव्हर्समध्ये 326 धावाच काढता आल्या.

पाकिस्तानला बसला जोरदार झटका

आता या विजयामुळे पाकिस्तानला कसा फटका बसला ते पाहू. या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. न्यूझीलंडने पहिला सामना जिंकत 2.149 च्या रनरेटसह पहिला क्रमांक मिळवला. त्यानंतर पाकिस्तानने नेदरलँड्सचा पराभव करत 1.438 नेट रनरेटसह दुसरा क्रमांक मिळवला. परंतु, काल आफ्रिकेच्या संघाने 102 धावांनी सामना जिंकला त्यांच्या या विजयाने त्यांचा नेट रनरेट 2.040 झाला. पाकिस्तानला मागे टाकून दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

Asian Games 2023 : चिराग-सात्विक जोडीने केला पराक्रम, बॅडमिंटन स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube