World Cup 2023 : मार्करमने झळकविले वर्ल्ड कपमधील वेगवान शतक; लंकेसमोर 429 धावांचे लक्ष्य

  • Written By: Published:
World Cup 2023 : मार्करमने झळकविले वर्ल्ड कपमधील वेगवान शतक; लंकेसमोर 429 धावांचे लक्ष्य

SA vs SL: वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) दक्षिण आफ्रिकेने (South Africa) आपली जोरदार सुरुवात केली आहे. एडन मार्करमने (Aiden Markram) श्रीलंकेच्या (Srilanka) गोलंदाजांची पिसे काढत तुफानी शतक झळकविले आहे. मार्करमने 49 चेंडूमध्ये शतक झळकवत वर्ल्ड कपमधील वेगवान शतक करण्याचा विक्रम केला आहे. आफ्रिकेच्या मार्करमबरोबर रॅसी डर ह्युसेन आणि क्विंटन डी कॉकने जोरदार शतके झळकविली आहेत. ड्युसेनने 108 धावांची, तर कॉकने 100 धावांची खेळी केली आहे. या तीन शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 428 धावांचा डोंगर उभा केला. वर्ल्डकपचा इतिहासात एवढी मोठी धावसंख्या आफ्रिकेने उभारली आहे. प्रत्युत्तरात श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. आतापर्यंत लंकेने 21. 2 षटकांत 5 बाद 154 धावा केल्या आहेत.


World Cup चं कॉकटेल कनेक्शन, दारू उत्पादक कंपन्यांसोबत कोटींचा करार

दक्षिण आफ्रिकाविरुध्द श्रीलंका सामना अरुण जेटली स्टेडियम खेळविण्यात येत आहे. एडन मार्करमने 54 चेंडूत 106 धावांची जबदरस्त खेळी केली. त्यात 49 चेंडूत शतक झळकविले. या खेळीत मार्करमने 14 चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. तो 196 च्या स्ट्राइक रेटने खेळला आहे. याचबरोबर आर्यलँडचे केविन ओ ब्रायन याचे 50 चेंडूत शतक झळकविण्याचा विक्रमही मोडला आहे. केविन ओ ब्रायनने हा विक्रम 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध केला होता.

नाणेफक जिंकत आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 5 बाद 428 धावांची खेळी केली आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच मोठी धावसंख्या झाली आहे. तर वर्ल्ड कपमध्ये प्रथमच तीन फलंदाजांनी शतक झळकविले आहेत. आफ्रिकेकडून सलामीवीर क्विंटन डी कॉक, रासी वॅन डर ड्युसेन आणि एडन मार्करमने तीन शतके झळकविली आहे. तर आफ्रिकेच्या फलंदाजांनी 59 चौकारही मारले आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या 31 षटकांत 214 धावा असताना मार्करम फलंदाजीला आला होता. क्विंटन डिकॉक हा शतक बनवून तंबूत परतला होता. मार्करम आणि ड्युसेनने लंकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू करत शतक झळकविले आहे.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक वेगवान शतक झळकविण्याचा विक्रमही आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सचा नावावर आहे. त्याला मार्करमने मागे टाकले आहे.

वनडे वर्ल्ड कपमधील सर्वाधिक वेगवान शतके

एडन मार्करम 49 चेंडूत श्रीलंकेविरुद्ध शतक झळकविले

आर्यलँडच्या केविन ओब्रायनने इंग्लंडविरुद्ध (2011 वर्ल्ड कप) 50 चेंडूत शतक झळकविले

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने श्रीलंकेविरुद्ध (2015 वर्ल्ड कप) 51 चेंडूत शतक ठोकले

दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सने वेस्ट इंडिज विरुद्ध (2015 वर्ल्ड कप) 52 चेंडूत शतक झळकविले

इंग्लंडच्या इयान मॉर्गनने आफगाणिस्तानविरुद्ध (2019 वर्ल्ड कप) 57 चेंडूत शतक झळकविले

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube