World Cup चं कॉकटेल कनेक्शन, दारू उत्पादक कंपन्यांसोबत कोटींचा करार
World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 ला आजपासून (दि. 5 ) सुरू होणार आहे. 45 दिवस चालणारे सामने क्रिकेट रसिकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. या स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये असणाऱ्या कॉकटेल कनेक्शनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (ICC World Cup 2023 Crore Sponsorship Deal With Liquor Companies)
Icc World Cup 2023: आजपासून रंगणार क्रिकेटचा थरार; 17 पॉइंट्समध्ये समजून घ्या सर्वकाही
आजपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. त्यामुळे जाहिरातींसाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. यात ट्रॅव्हल बुकिंग साइट मोबाइल गेमिंग अॅप यासह दारू आणि बिअर उत्पादक कंपन्या कशा मागे राहतील. प्रकाशित वृत्तांनुसार यंदाच्या विश्वचषकात कोट्यवधींची दारू आणि बिअर कंपन्यांनी स्पॉन्सरशिपसाठी कोटींचे करार केले आहे.
स्पॉन्सरशिपसाठी कोटींचे करार
आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी अनेक दारू उत्पादक कंपन्यांनी स्पॉन्सरशिपसाठी कोटींचे करार केले आहेत. आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी 8 ऑफिशियल पार्टनर्ससोबत करार करण्यात आले आहेत. यामध्ये बिअर कंपनी बीरा 91 आणि व्हिस्की ब्रँड रॉयल स्टॅग यांचा समावेश आहे.
Asian Games 2023 : भालाफेकमध्ये भारताने रचला इतिहास; नीरज पुन्हा ‘गोल्डन बॉय’
बिरा 91 ने 66 कोटी रुपयांचा करार केला आहे. प्रत्येक पार्टनरसोबत 60 ते 80 लाख डॉलर्सचा करार करण्यात आला आहे. ‘Bira 91’ व्यतिरिक्त यात Polycab, Thums-Up, Upstox, Nissan, Niam, Oppo आणि DP World या कंपन्यांचादेखील समावेश आहे.
रॉयल स्टॅग देणार 33 कोटी
ऑफिशियल पार्टनर्स व्यतिरिक्त आयसीसीने कॅटेगरी पार्टनर्ससोबतदेखील करारदेखील केले आहे. प्रत्येक ब्रँडसोबतची ही डील 30 ते 40 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 33 कोटी रुपयांची आहे. यामध्ये मद्य निर्मिती कंपनी रॉयल स्टॅगचा समावेश आहे. याशिवाय ड्रीम-11, जेकब्स क्रीक, नियर फाऊंडेशन, फॅन क्रेझ आणि टायका या कंपन्याही क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये कॅटेगरी पार्टनर म्हणून असणार आहेत.
टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक
टीम इंडिया विश्वचषकातील पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. त्याचबरोबर भारताचा पाकिस्तानसोबतचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडशी सामना खेळणार आहे.