Icc World Cup 2023: आजपासून रंगणार क्रिकेटचा थरार; 9 पॉइंट्समध्ये समजून घ्या सर्वकाही
Icc World Cup 2023 : आयसीसी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची ‘ओपनिंग’ 5 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून सुरु होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी संपूर्ण तयारी झाली आहे. (World Cup) एकूण यामध्ये 10 संघ सामील असणार आहेत. (Icc World Cup 2023) हा वर्ल्ड कपचा थरार 45 दिवस रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) या ठिकाणी खेळवला जाणार आहे.
या ठिकाणी रंगणार सामना
वनडे वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे एकूण १० शहरांमधील स्टेडियममध्ये पार पडणार आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, बंगळुरु, दिल्ली, चेन्नई, धर्मशाळा, लखनऊ, हैदराबाद, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरातील स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, पुण्यातील एमसीए गहुंजे स्टेडियम, बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियम, दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियम, चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियम, धर्मशाळातील एचपीसीए स्टेडियम, लखनऊमधील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम, कोलकातामधील इडन गार्डन स्टेडियम आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम या ठिकाणी हे सामने रंगणार आहेत.
पहिला सामना कधी आणि कोणासोबत होणार?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होणार आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत साखळी टप्प्यातील 45 सामने खेळवले जाणार आहेत. भारत आणि नेदरलँड यांच्यातील अखेरचा सामना बेंगळुरू येथे होणार आहे.
टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक
टीम इंडिया विश्वचषकातील पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. त्याचबरोबर भारताचा पाकिस्तानसोबतचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडशी सामना खेळणार आहे.
सेमीफायनलसाठी नियम
पहिला सेमीफायनल 15 नोव्हेंबरला मुंबईत तर दुसरा सेमीफायनल 16 नोव्हेंबरला कोलकात्यात खेळवला जाणार आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला तर त्याचा सामना मुंबईत होईल. पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला तर तो कोलकात्यात खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत भिडले तर टीम इंडियाला देखील कोलकात्यातच खेळावे लागणार आहे. आयसीसीने वेळापत्रक जाहीर करताना हा नियम ठरवला होता.
संघ उपांत्य फेरीसाठी कसे पात्र ठरतील?
राउंड रॉबिन प्रकारात सामना जिंकल्यास संघांना दोन गुण मिळतील. अव्वल ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. उपांत्य फेरीतील विजेत्या संघांमध्ये 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.
World Cup : महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार नसून चित्रपट दिग्दर्शक; अश्विनच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
पावसामुळे सामना रद्द झाल्यास ?
राऊंड रॉबिन स्टेजमध्ये पावसामुळे सामना रद्द झाल्यास, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. त्यावेळी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी रद्द झाल्यास राखीव दिवसाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा सामना पावसामुळे थांबवला जाणार आहे, त्याच ठिकाणाहून राखीव दिवशी समान गुणांसह खेळ पुन्हा सुरू होणार आहे.
उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी संघांना किती गुणांची आवश्यकता
२०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत, ऑस्ट्रेलिया आणि भारताने प्रत्येकी सर्वाधिक ७ सामने जिंकले होते. त्यानंतर भारतीय संघ १५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. टीम इंडियाचा एका सामन्यात पराभव झाला तर एक सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने ७ सामने जिंकले आणि २ सामने गमावले. कांगारू हा दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांनी उपांत्य फेरी गाठली होती. यावेळीही ७ विजयांमुळे संघाचे अव्वल ४ मधील स्थान जवळपास निश्चित होईल. जर संघांनी यापेक्षा कमी सामने जिंकले तर त्यांना त्यांच्या निव्वळ धावगतीवर अवलंबून राहावे लागेल. २०१९ मध्ये इंग्लंड १२ गुणांसह ३ स्थानावर आहे. त्याच वेळी न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे प्रत्येकी ११ गुण होते, परंतु चांगल्या धावगतीमुळे न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.