कसोटी क्रिकेटमध्ये नवे रेकॉर्ड : जो रुट, ब्रुकने पाकला फोडून काढले; इंग्लंडच्या एका डावात 823 धावा
Pakistan vs England Test Series: कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडत असतो. काही खेळाडूही कसोटीमध्येही टी-20 आणि वनडे क्रिकेटसारखे धावांचा पाऊस पाडतात. पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने (England) असा मोठा विक्रम केलाय. मुलतान येथील कसोटीत इंग्लंडने तब्बल 823 धावांचा डोंगर उभा केलाय. हॅरी ब्रुकने (Harry Brook) शानदार तिहेरी शतक झळकविले. त्याने 317 धावा केल्या. तर माजी कर्णधार जो रुटने (Joe Root) शानदार दुहेरी शतक झळकविले. त्याने 262 धावांची भागिदारी केलीय. या जोडीनेच तब्बल 580 धावा कुटल्या आहेत. पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा बनविल्यानंतर ते पराभवाचा छायेत आहेत. कारण दुसऱ्या डावात पाकचा संघ 6 विकेट्सच्या बदल्यात 152 धावांच करू शकला आहे.
नाद खुळा! जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी 900 एकराचं मैदान, 500 क्विंटल बुंदी, अन्…
चौथ्या दिवशी इंग्लंडने 823 धावांवर डाव घोषित केलाय. त्यामुळे इंग्लंडला 267 धावांची आघाडी मिळाली आहेत. या सामन्यात पाक पराभूत झाल्यास त्यांचा हा सलग तिसऱ्या पराभव असेल. कारण बांगलादेशने पाकिस्तानचा 2-0 ने धुव्वा उडविला आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडने तीन बाद 492 धावा केल्या. पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडने तीन विकेटच्या बदल्यात 607 धावा केल्या आहेत. त्यात जो रुटने आपले पाकविरुद्ध पहिले द्विशतक झळकविले आहे. जो रुट इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाज ठरलाय. त्याने 20 हजार धावा केल्यात. तर रुटचे हे कारकीर्दीतील सहावे द्वीशतक असून, अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा तो पहिला खेळाडू ठरला आहे. जो रुट आणि हॅरी ब्रुकने चौथ्या गड्यासाठी 454 धावांची भागीदारी केलीय.
रुटने 375 चेंडूत 17 चौकार मारत 262 धावा कुटल्या. जेवनानंतर हॅरी ब्रुकने शानदार फलंदाजी करत सॅम अयुबच्या चेंडूवर चौकार मारत तिहेरी शतक झळकविले. त्याने 239 चेंडूत तिहेशी शतक झळकविले आहे. ब्रुकने 317 धावांची खेळी केली. त्यात 29 चौकार आणि तीन षटकार मारले. त्यानंतर इंग्लंडने 148 ओव्हरमध्ये 7 विकेटसच्या बदल्यात 823 धावा केल्या.
मोठी बातमी! आमदार तानाजी मुटकुळेंची प्रकृती खालावली, एअर अॅम्बुलन्सने मुंबईला हलवलं
धावांचा पाऊस पाडणारे संघ
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेच्या नावावर सर्वात मोठा स्कोर आहे. 1997 भारताविरुद्ध श्रीलंकेने 952 धाव केल्या होत्या. पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये एेवढी मोठी धावसंख्या झाली होती. तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (1938) 7 विकेट्सच्या बदल्यात 903 धावा कुटल्या होत्या. तर हा सामना एेतिहासिक द ओव्हल मैदानात झाला होता. तर इंग्लंडने 1930 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 849 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पाकविरुद्ध 823 धावा करत चौथ्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजने पाकविरुद्ध 1958 मध्ये 790 धावा केल्या होत्या.