न्यूझीलंडसमोर 283 धावांचं लक्ष्य; जो रुटची धुव्वादार बॅटींग
आयसीसी विश्वचषकाचा पहिला सामना आज इंग्लड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये सुरु आहे.या सामन्यातील पहिल्या इनिंगमध्ये इंग्लडचा फलंदाज जो रुटने धुव्वादार बॅटींग करीत 77 धावा केल्या आहेत. इंग्लडने न्यूझीलंडसमोर 283 धावाचे लक्ष्य ठेवलं आहे.
Dance Diva: नोरा फतेही ते झरीन खान या आहेत, ‘बॉलिवूडच्या डान्स दिवा
इंग्लडने पहिली फलंदाजी घेत जोरदार प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं आहे. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडचे खेळाडू तंबूत परतत असताना जो रुटने कमान सांभाळली आहे. जो रुटने 86 चेंडूमध्ये षटकार आणि 4 चौकार ठोकून 77 धावां पूर्ण केल्या आहेत.
Jaya Prada : जया प्रदा हाजिर हो! न्यायालयानं काढला जामीनपात्र वारंट; नेमकं प्रकरण तरी काय?
कर्णधार जोस बटलर आणि सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टो यांनी चांगली सुरुवात केली पण त्यांनी म्हणावं तस यश मिळालं नाही. जॉनी बेअरस्टो याने 35 चेंडूत 33 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये बेअरस्टो याने एक षटकार आणि चार चौकार ठोकले. तर कर्णधार जोस बटलर याने 42 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता.
Tiger 3 Trailer: ‘ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार भाईजानच्या टायगर-3 ’चा ट्रेलर
त्यानंतर जो रुट, जॉनी बेअरस्टो आणि जोस बटलर यांचा अपवाद वगळला तर फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजासमोर टिकल्याचं दिसला नाही. यामध्ये डेविड मलान 14, हॅरी ब्रूक 25, मोईन अली 11 आणि लियाम लिव्हिंगस्टोन 20 धावांवर तंबूत परतले आहेत.
Lahore 1947: सनी पाजी अन् आमिर खान आले एकत्र; दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत
सॅम करन आणि ख्रिस वोक्स या अष्टपैलू खेळाडूंनाही खेळप्रदर्शन दाखवता आल्याचं दिसून आलं नाही. सॅम करन याने 14 तर ख्रिस वोक्स याने 11 धावांमध्ये गार झाल्याचं पाहायला मिळालं.
Nanded Hospital Deaths : मृत्यूचे तांडव सुरूच! सरकारी दवाखान्यात आणखी 7 मृत्यू; मृतांचा आकडा 31 वर
न्यूझीलंडकडून मॅट हेनरी याने अचूक टप्प्यावर मारा करत 10 षटकात 48 धावां दिल्या आहेत. तर इंग्लडच्या तीन फलंदाजांना तंबूत परतावून लावले आहे. तर दुसरीकडे ट्रेंट बोल्ट यानेही 48 धावांची भेट इंग्लडला देत एक विकेट घेतला आहे.
दरम्यान, मिचेल सँटनर याच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी गुढगे टेकल्याचं पाहायला मिळालं होतं. मिचेल सँटनर याने 10 षटकात 37 धावां खर्च केल्या आहेत. याबदल्यात त्याने इंग्लडच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं आहे. तर ग्लेन फिलिप्सने 3 षटकांत 17 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या आहेत.