टीम इंडियाचा इंग्लंड दौरा आटोपला, आता कधी अन् कुणाशी होणार मॅच? जाणून घ्या, शेड्यूल..

Team India Schedule : इंग्लंड दौऱ्याचा गोड शेवट केल्यानंतर टीम इंडिया (Team India) पुढील दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. याआधी इंग्लंड विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात भारताने (IND vs ENG Test Series) फक्त सहा धावांनी विजय मिळवला. हा सामना इंग्लंडच्याच हातात होता. परंतु, अखेरच्या क्षणी गडबड (Asia Cup 2025) झाली आणि पराभव स्वीकारावा लागला. यानंतर आता आशिया कप स्पर्धेची तयारी भारतीय संघाने सुरू केली आहे.
आशिया कप क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये होणार आहे. ही स्पर्धा टी 20 प्रकारात होणार आहे. स्पर्धेची सुरुवात सप्टेंबर महिन्यात होणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडिया युएईला (IND vs UAE) टक्कर देणार आहे.
पाकिस्तानलाही देणार टक्कर
भारतीय संघाचा दुसरा सामना 14 सप्टेंबर रोजी होणार (India vs Pakistan) आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही टीम एकमेकांच्या कट्टर विरोधी आहेत. त्यामुळे या सामन्यांना कायमच गर्दी होत असते. या सामन्याचा रोमांच काही वेगळाच असतो. यानंतर 19 सप्टेंबर रोजी भारतीय संघाचा तिसरा सामना ओमान विरुद्ध होईल. भारत आणि पाकिस्तानचा ग्रुप ए मध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये युएई आणि ओमानही आहेत. तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे.
ब्रेकिंग : ओव्हल कसोटीत भारताने रोमांचक विजय मिळवत मोडला इंग्लंडचा घमंड; मालिका बरोबरीत
जर दोन्ही संघ आपापल्या ग्रुपमध्ये पहिल्या दोनमध्ये आले तसेच त्यांनी सुपर 4 मध्ये प्रवेश केला तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोनदा टक्कर होऊ शकते. जर दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले तर दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने असतील. आशिया कपमधील सुपर 4 साखळी फेरीचे सामने 21 सप्टेंबरपासून सुरू होतील. या फेरीत प्रत्येक संघ एकेकदा एकमेकांच्या विरोधात आमनेसामने असतील. यानंतर टॉप दोन संघ फायनलमध्ये प्रवेश करतील. आशिया कपमधील फायनल मॅच 28 सप्टेंबरला होईल.
भारतीय संघात बदलांची शक्यता..
इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघातील काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. या स्पर्धेत कर्णधारही बदलू शकतो अशा चर्चा आहेत. सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा यांना संधी मिळू शकते. हार्दिक पांड्याही (Hardik Pandya) फिट होऊन संघात वापसी करू शकतो.
भारतीय संघाचे वेळापत्रक (ग्रुप स्टेज)
10 सप्टेंबर : भारत vs युएई – अबुधाबी
14 सप्टेंबर : भारत vs पाकिस्तान- दुबई
19 सप्टेंबर : भारत vs ओमान – अबुधाबी