Dnyanradha Bank Scam : ‘ज्ञानराधा’ घोटाळ्यात जॉन्सन यांची एन्ट्री; अर्चना कुटेंचा बाजार उठणार….

Dnyanradha Multistate Scam Collector Vivek Johnson’s entry : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात (Dnyanradha Multistate Scam) आता कलेक्टरची एन्ट्री झालीय. त्यामुळे मात्र अर्चना कुटेंचे फासे आणखी आवळणार (Archana Kute) आहेत. कसं, काय ते या सविस्तर पाहूयात …
अर्चना कुटेंचे फासे आवळणार?
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात अजूनपर्यंत कलेक्टरची एन्ट्री झाली नव्हती. परंतु विवेक जॉन्सन यांनी नव्याने पदभार स्विकारला अन् जनता दरबार (Suresh Kute) घेतला. यावेळी ठेवीदारांच्या भावनांची त्यांनी दखल घेतली. कलेक्टर साहेब… तुम्ही सर्वसामान्य ठेवीदारांच्या जीवनमरणाच्या प्रश्नात लक्षच घातलं आहे. तर आता कुटे दाम्पत्याची मालमत्ता विक्रीची प्रक्रिया सुरु करा. लपून बसलेल्या अर्चना कुटेला पकडून आणण्याच्या सूचना पोलिसांना द्या अन् जेलमध्ये घाला. ठेवीदारांचा पोलिसांवर भरोसा राहिलेला नाही, आपल्यासारखे अधिकारीच काहीतरी न्याय देऊन गोरगरीबांना पैसे मिळवून देऊ शकतात, अशी साद विवेक जॉन्सन यांना जनता दरबारातून घातली गेली.
…तेव्हा अभिनेता संजय दत्तने कुराण भेट दिली होती; अभिनेत्री अमीषा पटेलचा मोठा खुलासा
सोमवार, मंगळवार, बुधवार जनता दरबार
सर्वसामान्यांच्या मनात नेमकं चाललंय काय? हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन जनता दरबार घेत आहेत. या तक्रारींचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने सोमवार, मंगळवार, बुधवार हे तीन दिवस दुपारी 12 ते 2 या वेळेत जनता दरबार पार पडत असल्याची माहिती मिळतेय. तर आठवड्याच्या सुरुवातीचे तीन दिवस कलेक्टर साहेब जनतेसाठी रोज 3 तास देत आहेत. यावेळेत तक्रारदार नागरिकांशी संवाद साधून, तक्रारींचे निरसन करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी जॉन्सन करत आहेत.
ठेवीदारांमध्ये आशेचा एक नवा किरण
पहिल्याच जनता दरबारामध्ये कलेक्टर साहेबांपुढे सर्वसामान्यांनी समस्यांची मोठी यादीच वाचली. यामध्ये प्रामुख्याने ज्ञानराधाच्या ठेवीदारांची संख्या मोठी होती. आतापर्यंत कशा पद्धतीने लढा दिला, अनेकदा आंदोलने केली, निवेदने दिली तरीही न्याय मिळाला नाही. प्रत्येकवेळी केवळ आश्वासनाचं गाजरचं दाखवलं जातं, असा नाराजीचा सूर या नागरिकांमध्ये होता. यावर जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी ज्ञानराधाची फाईल मागवून घेऊन लवकरच त्यावर भाष्य करेल, असा विश्वास ठेवीदारांना दिलाय. त्यामुळे ठेवीदारांमध्ये आशेचा एक नवा किरण निर्माण झालाय.
पवित्र प्रांगणात राजकारण आणू नका, शरद पवारांनी फटकारलं…
ज्ञानराधा घोटाळा नेमका काय?
नोव्हेंबर 2023 मध्ये मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पथसंस्था अडचणीत आलीय. माधुरी दिक्षीत, सचिन पिळगांवकर हे ज्ञानराधाचे ब्रॅंड अंबेसेडर होते.ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा प्रकरण मराठवाडा अन् पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकांशी संबंधित आहे. आतापर्यंत प्रकरणी बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे याचबरोबर नवी मुंबईत देखील छापे टाकण्यात आले होते.
ज्ञानराधाच्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत 52 हून जास्त शाखा होत्या. यामध्ये तब्बल 2,467 कोटी रूपयांचा घोटाळा झालाय. मराठी इंडस्ट्रीतील अनेक सुपरस्टार या पतसंस्थेचे ब्रॅंड अंबेसेडर होते. सुरेश कुटे आणि त्यांची सहकारी मंडळी असे एकुण 14 जण या प्रकरणात आहेत. गुंतवणूकदारांना 14 टक्क्यांचा परतावा देण्याच्या नावाखाली.. त्यांनी वैयक्तिक कर्ज, वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी अशा घबाडातून हे पैसे जमा केलेत. सुरेश कुटेंनी गुंतवणूकदारांचा पैसा हा ज्ञानराधाच्या इतर कामांत गुंतवला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली.
वेगवेगळ्या ठिकाणी सुरेश कुटे याने साथीदारांकडून 1300 ते 1400 कोटी रूपये मूल्य असलेली संपत्ती जप्त करण्यात आलीय. हा पैसा न्यायालयीन प्रक्रियेनंतर गुंतवणूकदारांना परत मिळू शकतो. परंतु ठेवीदारांनी आता अर्चना कुटेंची संपत्ती जप्त करा, अन् आमचा पैसा परत करा, असा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं, ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.