तिरुमला उद्योग समूहाच्या प्रमुखांच्या अडचणी वाढल्या; सुरेश कुटेंनंतर पत्नी पोलिसांच्या ताब्यात

तिरुमला उद्योग समूहाच्या प्रमुखांच्या अडचणी वाढल्या; सुरेश कुटेंनंतर पत्नी पोलिसांच्या ताब्यात

Tirumala Group owners wife arrested after Suresh Kute Arrest: तिरुमला उद्योग समूहाचे (Tirumala Udyog Group) प्रमुख सुरेश कुटे (Suresh Kute) यांना बँक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना आज (7 जून) च्या पहाटे त्यांच्या पुण्यातील राहत्या घरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बीड पोलिसांनी (Beed Police) पुण्यात ही कारवाई केली असून, या प्रकरणी कुटे यांच्याविरोधात विविध ठिकाणी पाच गुन्हे दाखल आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

बीडमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट या पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्याविरोधात ठेवीदारांनी तक्रार दाखल केली होती. जास्त व्याजदराचे आमिष दाखवून 74 लाख 24 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार माजलगाव शहरातील तब्बल 17 ठेवीदारांनी दाखल केली होती. त्यामध्ये कुटे यांच्यासह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कुटे यांच्यासह त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

‘ते दिलेला शब्द मोडतील आणि तुमचे पक्षही फोडतील’; आदित्य ठाकरेंचा जेडीयू-टीडीपीला इशारा

दरम्यान ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये 6 लाख 50 हजार ठेवीदारांचे 3 हजार कोटी रुपये अडकल्याने ठेवीदार प्रचंड आर्थिक तणावात आहेत. तात्पुरती गरज भागवावी म्हणून लोकांकडून घेतलेले देणे परत करताना ठेवीदारांच्या नाकीनऊ आले आहे. मात्र, सुरेश कुटे यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तुम्ही माझ्या बँकेतून पैसे काढणार आहात आणि दुसऱ्या बँकेत व्याजासाठी टाकणारच आहात तर माझ्याच बँकेत पैसे राहू द्या, असं म्हणून गरजवंत ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे ठेवीदार आक्रमक होत आहेत. मागील 9 महिन्यांपूर्वी कुटे यांनी दिलेल्या चेकच्या तारखा संपत आल्याने ठेवीदार आता बँकेत चेक टाकणार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ज्ञानराधाच्या 51पैकी 26 शाखा बंद आहेत.

Imran Khan: इम्रान खानची मजा! तुरुंगात मिळत आहे ‘ही’ सुविधा

तसेच या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरेश कुटे यांना दुपारी 2 वाजेपर्यंत ज्ञानराधा बँकेच्या घोटाळ्यासंबंधीचे दस्तऐवज सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार कुटे यांना ठेवीदारांच्या ठेवी कसे परत करणार, आरबीआय सोबत झालेला पत्रव्यवहार इत्यादी कागदपत्रे पोलिसांना सादर करायची सांगितली आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube