दोन सख्खे भाऊ गेले, सासऱ्याची मृत्यूशी झुंज, आई अन् पत्नींचा आक्रोश; पुणे विषारी दारू प्रकरणाने परिसर सुन्न
Pune poisonous liquor case मुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळलेली आहे.
Pune poisonous liquor case brothers passed away, father-in-law’s struggle with death, mother and wife’s lament : पुण्यातील दापोडी फुगेवाडीत विषारी दारुमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळलेली आहे. अद्याप देखील या विषारी दारु प्राशन केलेल्या परिसरातील इतरही नागरिकांना त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात रवाना करण्यात येत आहे.
या दरम्यान या परिसरामध्ये लेट्सअप मराठीने भेट दिली तेव्हा एका कुटुंबामध्ये विषारी दारी प्यायल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झालेला आहे. तर त्यांचे वडिल देखील हीच दारू प्यायल्याने मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यामुळे या पत्नी आणि आई अक्षरश: छाती फुटेपर्यंत रडत असल्याचं पाहायला मिळालं.
होम्बळे फिल्म्सचं मराठी प्रेक्षकांना खास सरप्राईज; पहिली मराठी हिप-हॉप म्युझिकल फिल्म जाहीर!
या प्रकरणामध्ये राठोड या कुटुंबातील राजेंद्र आणि विजय राठोड तसेच त्यांचे वडिल प्रकाश राठो यांना दारूचे व्यसन होते. नेहमीप्रमाने ते 27 तारखेच्या रात्री देखील दारू प्यायले होते. मात्र ती दारू ते नेहमी पित असलेली दारू नव्हती. तर थेट विषारी दारू होती. ही दारू प्यायल्यानंतर सुरूवातीला यातील विजय राठोड यांना डोळ्यांना न दिसण्याचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा सकाळी मृत्यू झाला.
Liquor Poisoning : पुण्यात विषारी दारूने मृत्युचं तांडव; मेथनॉल शरीरात गेल्यावर नेमकं काय होतं?
त्यानंतर त्याचे भाऊ राजेंद्र यांना देखील दुसऱ्या दिवशी अचानक अस्वस्थता जाणवू लागली. तसेच त्यांना तोंडातून फेस येताच त्यांचा मृत्यू झाल्याचं या कुटुंबीयांनी सांगितलं. तसेच या दोघांचे वडिल प्रकाश यांची देखील प्रकृती हीच दारू सेवन केल्याने अद्याप अस्वस्थ असल्याने ते देखील मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यामुळे आता कुटुंबामध्ये कोणीही कर्ता पुरूष न राहिल्याने या मुलांच्या आई आणि पत्नींने फोडलेल्या टाहोमुळे परिसर सुन्न झाला आहे.