धक्कादायक! हृदयविकाराचा झटका म्हणत अंत्यसंस्कार पण एका तक्रारीने पत्नीच्या ‘त्या’ कृत्याचा पर्दाफाश
sangli murder case सांगलीतील डफळापूर येथे एकाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला पण तक्रारीनंतर या प्रकरणामध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
sangli murder case Husband dies by heart attack wife concocts a scheme police reveals truth : सांगलीतील डफळापूर येथे एका व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे वृत्त होते. एवढेच काय त्याच्या अंत्यसंस्कार देखील पार पडले होते. मात्र एका व्यक्तीने तक्रार दिल्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली अन् एका मागून एक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊ सविस्तर…
सांगलीतील डफळापूर येथे आप्पासाहेब चव्हाण या 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अंत्यविधी झाला. मात्र त्यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने किंवा नैसर्गिक मृत्यू नव्हता. त्यामुळे राजू जाधव यांनी मृताच्या पत्नी, मुलगा आणि पत्नीच्या प्रियकराविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांच्या तपासात या व्यक्तीचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने नाही तर थेट जेवणातून गुंगीचे औषध दिल्यानंतर गळा आवळून खून झाला होता.
मृत्युनंतरही दुसऱ्यांच्या उपयोगी यावा देह; बीडच्या गोदावरीबाईंचा प्रेरणादायी निर्णय
या प्रकरणी पोलिसांनी या व्यक्तीची पत्नी सुनिता चव्हाण त्यांचा मुलगा आणि पत्नीच्या प्रियकराविरोधात गुन्ह दाखल केला आहे. दरम्यान या तिघांनी चव्हाण यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचत अंत्यसंस्कार केले गेले. हा सर्व प्रकार पत्नीने अनैतिक संबंधांतून केला आहे. असं तापासात समोर आलं आहे.
पाचपुते-पवार संघर्षाचा नवा पायंडा; शरद पवार-अजित पवारांची भाषा रोहित पवारांच्या तोंडी
याबाबत माहिती देताना सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा माहिती फिर्यादीने गोपनीय खबर दिली आहे. त्यावरून तपास अन् त्यानंतर या खून आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या कलमांच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.