‘एसआयआर रद्द करा, दुष्काळग्रस्तांना न्याय द्या…’ लंके यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर येथे इंडिया आघाडीचा मोर्चा
Nilesh Lanke Janakrosh Morcha Ahilyanagar; मोर्चा सकाळी 11 वाजता जुने आरटीओ कार्यालयापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे.
India Alliance Nilesh Lanke Janakrosh Morcha Ahilyanagar: अहिल्यानगर : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेविरोधात तसेच दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने बुधवारी (ता. 7) अहिल्यानगर येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
पाचपुते-पवार संघर्षाचा नवा पायंडा; शरद पवार-अजित पवारांची भाषा रोहित पवारांच्या तोंडी
मोर्चाची सुरुवात बुधवारी सकाळी 11 वाजता जुने आरटीओ कार्यालय येथून होणार आहे. त्यानंतर डीएसपी चौक, अहिल्यानगर महानगरपालिका मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. या ठिकाणी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे. एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा, अशी प्रमुख मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पात्र मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये, तसेच मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे, अशी भूमिका इंडिया आघाडीने मांडली आहे.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांकडेही मोर्चातून लक्ष वेधण्यात येणार आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि मजुरांना शासनाने तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
या मोर्चात इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिक सहभागी होणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन इंडिया आघाडी, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.