‘नटसम्राट’ नाना पाटेकर अनंतात विलीन; साश्रू नयनांनी चाहत्यांचा भावपूर्ण निरोप

Veteran actor Nana Patekar passed away रात्री उशीरा त्यांच्यावर डोणजे या गावामध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

Veteran Actor Nana Patekar Passed Away

Veteran actor Nana Patekar passed away last rites have been performed in Pune Donje : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झाल्याने चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील एका पर्वाचा अंत झाला आहे. नानाने अचानक एक्झिट घेतल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील डोना पावला येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर रूग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर रात्री उशीरा त्यांच्यावर पुण्यातील त्यांच्या डोणजे या गावामध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

अंबानी हेच भारताचे खरे बॉस आहेत का? स्टारलिंकला परवान्यावरून एलन मस्क यांचा सरकारला सवाल

यावेळी अनेक चाहत्यांसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील दिग्गज तसेच सामाजिक क्षेत्रातील लोक उपस्थित होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीयांचं सांत्वन करत श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, . उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनील तटकरे, माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, अर्जुन खोतकर, जॅकी श्राफ, यांच्यासह अनेक दिग्गजांनी यावेळी नानांना अखेरचा निरोप दिला.

हुथीचा सौदीवर हल्ला; रियाधसाठी एअर इंडिया आणि इंडिगोची विमानसेवा रद्द 

नानांच्या इच्छेप्रमाणे शेतातच अंत्यविधी

नाना पाटेकर यांनी ज्यामध्ये त्यांनी मृत्यूनंतर त्यांच्यावर कशापद्धतीने अंत्यसंस्कार करायचे हे देखील सांगून ठेवलेले होते. त्याचा व्हिडीओ देकल व्हायरल झाला. हा व्हिडीओ ऐकून प्रत्येकाला त्यांच्यातील निसर्गाची काळजी असणारा एक दक्ष नागरीक दिसून येतो आणि डोळे पाणावल्या शिवाय राहत नाही.

पुणे विद्यापीठाला एफडीएचा दणका! कँटीनच्या किचनमध्ये झुरळं अन् अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित

उद्या मी जाणार आहे हे मला माहिती आहे. त्यानंतर माझ्यावर अंत्यसंस्कार करायला 12 मण लाकडं लागणरा आहेत. हेही मला माहिती आहे. जी माझी शेवटीची संपत्ती असेल. बेटा मी ती माझी लाकडं जमा करून ठेवलेली आहेत. जी वाळलेली आहेत. ओली लाकडं वापरू नका. नाही तर धूर होईल आणि अंत्यसंस्काराला आलेल्या मित्र परिवाराच्या डोळ्यात तो जाऊन पाणी येईल. त्यामुळे मरताना माझा गैरसमज होईल की, माझ्यासाठी रडत आहेत. कमीत कमी मरताना तरी माझा कोणताही गैरसमज होता कामा नये.

SIR रद्द करा; मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या; इंडिया आघाडी व पुरोगामी संघटनांची मागणी

दरम्यान हा व्हिडीओ तसेच ज्या नाम फाँडेशनची स्थापना नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी केली होती. त्याचे सीईओ गणेश थोरात यांनी देखील या व्हिडीओचा उल्लेख करत सांगितलं की, हे खर आहे की, नाना पाटेकरांनी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोणती लाकडं वापरायचीी हे सांगून ठेवलं होतं. तसेच मला माझ्या शेतात माझे अंत्यसंस्कार कला मला त्या मातीत राहू द्या, त्या मातीत मिसळा. असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी सांगितल्या प्रमाणेच त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत. असं गणेश थोरात यांनी सांगितलं.

follow us