पुणे विद्यापीठाला एफडीएचा दणका! कँटीनच्या किचनमध्ये झुरळं अन् अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित
FDA action on Pune University पुणे विद्यापीठाच्या कँटीनच्या किचनमध्ये झुरळं आढळून आल्याने थेट कँटीनचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
FDA action on Pune University License suspended due to cockroaches and unhygienic in canteen kitchen : पुणे विद्यापीठाला एफडीएने मोठा दणका दिला आहे. पुणे विद्यापीठाच्या कँटीनच्या किचनमध्ये झुरळं त्याचबरोबर अस्वच्छता आढळून आल्याने थेट कँटीनचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
SIR रद्द करा; मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या; इंडिया आघाडी व पुरोगामी संघटनांची मागणी
कँटीनच्या किचनमध्ये झुरळं अन् अस्वच्छता…
याबाबत एफडीएकडून जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एफडीएने राज्यातील अनेक आस्थापनांवर विविध कारणांमुळे परवाना निलंबनाची कारवाई केली आहे. त्यात पुणे विद्यापीठाच्या कँटीनमध्ये जिवंत झुरळांचा प्रादुर्भाव: कँटीनच्या किचन व परिसरात जिवंत झुरळांचा (live cockroaches) मोठ्या प्रमाणावर वावर आढळला. अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्न निर्मिती: अन्न शिजवणे आणि अन्न साठवणुकीची (improper storage) जागा अत्यंत अस्वच्छ व आरोग्यास घातक स्थितीत आढळली. आरोग्य व स्वच्छतेचा अभाव: स्वच्छता (sanitation) आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेमध्ये (personal hygiene) गंभीर तुटी आढळून आल्या. रेकॉर्ड उपलब्ध नाही: अन्न सुरक्षेशी संबंधित आवश्यक नोंदी व कागदपत्रे (Food safety records) तपासणीसाठी उपलब्ध नव्हती.
कॅन्सर औषधांच्या किमती 70% पर्यंत कमी होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान महाराष्ट्रात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत शासन अत्यंत कठोर आहे. ग्राहकांच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. मुदतबाह्य किंवा फेरफार केलेल्या अथवा अस्वच्छ व असुरक्षित परिस्थितीत तयार केलेल्या अन्नपदार्थांची विक्री/साठवणूक करणाऱ्या आस्थापनांवर अशीच कठोर कायदेशीर कारवाई चालू राहील. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.