अबब! 52 कोटींचं केळ पठ्ठ्यानं खरेदी केलं अन् खाऊन टाकलं; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

अबब! 52 कोटींचं केळ पठ्ठ्यानं खरेदी केलं अन् खाऊन टाकलं; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Chinese Cryptocurrency Founder Justin Sun Eats Banana Video : एका चिनी उद्योजकाने तब्बल 52 कोटी रूपयांना एका केळीची (banana) प्रतिकृती खरेदी केली, अन् काही क्षणांतर लगेच ती खाल्ली. या घनटेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. चिनी उद्योजक जस्टिन सन यांनी न्यूयॉर्कमधील सोथेबी ऑक्शन हाऊसमध्ये भिंतीवर टेप लावलेली केळी 62 लाख डॉलर्स (सुमारे 52.37 कोटी रुपये) खरेदी केली आहे. या केळीला कलाकृती म्हटलं जातंय. ही कलाकृती प्रसिद्ध इटालियन कलाकार मॉरिझियो कॅटेलन यांनी तयार (viral news) केलीय. ज्याचं नाव कॉमेडियन आहे.

चायनीज क्रिप्टोकरन्सी संस्थापक जस्टिन सन (Chinese Cryptocurrency Founder Justin Sun) यांनी ही केळीची कलाकृती खरेदी केल्यानंतर खाल्ली आहे. ही घटना व्हिडिओत कैद झालीय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी ही कलाकृती लिलावात (viral video) जवळपास 52 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. याकडे एक आश्चर्चकारक घटना म्हणून पाहिलं जातंय. केळीची कलाकृती पेरोटिन गॅलरी द्वारे 2019 मध्ये प्रथम अनावरण करण्यात आली होती, त्यानंतर तिला त्वरित प्रसिद्धी मिळाली. हे व्यंग्य आणि समकालीन कला यांचे मिश्रण दर्शवते. पदार्पणापासूनच एक सांस्कृतिक चिन्ह बनले आहे.

‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ अशी कोणतीही संकल्पना संविधानात नाही ; असीम सरोदे

चिनी क्रिप्टो उद्योजक जस्टिन सन यांनी न्यूयॉर्कमधील सोथेबीच्या लिलावात केळीची कलाकृती $62 लाख (अंदाजे ₹53 कोटी) मध्ये खरेदी केली. इटालियन कलाकार मॉरिझियो कॅटेलन यांनी तयार केलेली आणि कॉमेडियन शीर्षक असलेली ही कलाकृती (केळी) भिंतीवर बांधली होती. खरेदीनंतर स्टेजवर केळी खाऊन त्यांनी उपस्थितांना आश्चर्यचकित केलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी “ही केळी खूप चवदार आणि इतरांपेक्षा चांगली आहे. खरोखर चांगली आहे,” अशी टिप्पणी देखील केलीय.

VIDEO : उठाव केला पाहिजे, अन्यथा… लोकशाही धोक्यात; शरद पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट

लिलावाची सुरुवात $800,000 च्या बोलीने झाली होती. एका मिनिटात ही बोली $150,000 पर्यंत वाढली. सन यांनी सिद्ध केलंय की, “ही फक्त केळी नाही. कला, मेम्स आणि क्रिप्टोकरन्सी समुदायांना जोडणारी सांस्कृतिक घटना दर्शवते.” जस्टिन सन हे क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म ट्रॉनचे संस्थापक आहेत. ते जागतिक स्तरावरील शीर्ष ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. त्याच्या वादग्रस्त हालचाली आणि स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखले जाणारे, सन हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक देखील आहेत. त्यांनी ट्रम्प यांच्या क्रिप्टोकरन्सीच्या समर्थनाची प्रशंसा केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube