‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ अशी कोणतीही संकल्पना संविधानात नाही ; असीम सरोदे
Asim Sarode Statement On caretaker Chief Minister : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल समोर आलेत. महायुतीने यावेळी तब्बल 230 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ 46 जागा आल्या आहेत. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी चौदावी विधानसभा विसर्जित झाCM पदासाठी भाजपाचं धक्कातंत्र? मुरलीधर मोहोळांच्या नावाची चर्चा, मोहोळांनीही क्लिअरच केलं..ली. परंतु अजून महायुतीकडून मु्ख्यमंत्रिपदाचा चेहरा स्पष्ट झालेला नाही. एकनाथ शिंदे सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री (caretaker Chief Minister) म्हणून कार्यभार पाहात आहेत. यावर आता विरोधकांनी (Thackeray Group) मात्र महायुतीवर हल्लाबोल केलाय.
शिवसेना ठाकरे गटाचे वकिल असीम सरोदे (Asim Sarode) यांनी ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ या संकल्पनेवर मोठं विधान केलंय. असीम सरोदे म्हणाले की, ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ अशी कोणतीही संकल्पना संविधानात नाही. विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर या ‘संविधान दिवस’ असलेल्या दिवशी संपला आहे. संविधान दिवस साजरा झाला. पण इथे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्याचा कुणी दावा सुद्धा केला नाही. तरीही राज्यपालांनी ‘राष्ट्रपती राजवट’ जाहीर करण्याचा कोणताही अहवाल, सल्ला किंवा शिफारस राष्ट्रपतींकडे केलेली नाही. हे सगळे संविधानिक प्रक्रियेत बसत नाही आणि असंवैधानिक सुद्धा ठरते.
VIDEO : उठाव केला पाहिजे, अन्यथा… लोकशाही धोक्यात; शरद पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट
आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची परिस्थिती आहे व अशी राष्ट्रपती राजवट सरकार स्थापन होतांना रद्द करता येते. संविधानाचा कैवार घेणारे कोण-कोण याबाबत बोलत आहेत बघावे. संविधान केवळ निवडणूक प्रचार काळात बोलण्याचा विषय आहे का? संविधानिक नैतिकता जोपासण्यासाठी सतत काम करावे लागते, अशी फेसबुक पोस्ट ठाकरे गटाचे वकिल असिम सरोदे यांनी केलेली आहे.
मोठी बातमी! दक्षिण आफ्रिकेत मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश; तीन खेळाडूंना अटक
महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक 30 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर सहामहिन्याच मतदारांचा कौल कसा बदलू शकतो? असा प्रश्न देखील अनेकांच्या मनामध्ये आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि पराभूत उमेदवार पराभवाचं खापर ईव्हीएम मशीनवर फोडत आहेत. परंतु आता या निकालाला आव्हान कसं द्यायचं? या संदर्भात प्रसिद्ध वकिल असिम सरोदे यांनी पराभूत उमदेवारांना मार्गदर्शन देखील केलंय. त्यानंतर आता त्यांनी ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ अशी कोणतीही संकल्पना संविधानामध्ये नसल्याचं म्हटलंय.